सलग तीन पराभवांनंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2023च्या 40व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघावर विजय मिळवला. शनिवारी (दि. 29 एप्रिल) हैदराबादने या सामन्यात दिल्लीला 9 धावांना मात दिली. तसेच, हंगामातील तिसरा विजयही नावावर केला. या विजयात हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि हेन्रीच क्लासेन यांनी शानदार अर्धशतकी खेळी साकारली. याव्यतिरिक्त मयंक मार्कंडे यानेही 4 षटकात 20 धावा खर्च करत 2 विकेट्स नावावर केल्या. या विजयानंतर कर्णधार एडेन मार्करम याने मोठी प्रतिक्रिया दिली.
या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) याने आपल्या खेळाडूंची प्रशंसा केला. तो म्हणाला की, “संघाच्या शानदार प्रयत्नांमुळे हा विजय मिळाला. सर्व खेळाडूंनी आपापल्या भूमिका पूर्णपणे साकारल्या. मला यामध्ये काहीच अडचण नाही की, जर कुणी योग्य दृष्टिकोन ठेवून खेळण्याचा प्रयत्न करताना अपयशी होतो. यामुळे आम्हाला एखाद्या खेळाडूला समजून घेणे सोपे जाते. याचे संपूर्ण श्रेय संघाला जाते.”
एडेन मार्करम याने पुढे बोलताना म्हटले की, “हेन्रीच क्लासेन शानदार फॉर्ममध्ये आहे आणि अभिषेकने दाखवले आहे की, तो किती कठोर मेहनत घेत आहे. क्लासेन याने पुनरागमन करत आक्रमक फलंदाजी करणे सुरू ठेवले. आम्हाला या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी विकेट घेणे गरजेचे होते. आम्ही मधल्या षटकात 2 महत्त्वाचे विकेट्स मिळवल्या.”
The Delhi Capitals came close to the target but it's @SunRisers who emerge victorious in Delhi 👏🏻👏🏻#SRH register a 9-run victory over #DC 👌🏻👌🏻
Scorecard ▶️ https://t.co/iOYYyw2zca #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/S5METD41pF
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
गोलंदाजांनी व्यवस्थित निभावली भूमिका
मार्करम याने त्याच्या गोलंदाजांचेही कौतुक केले. तो म्हणाला की, “या खेळपट्टीवर चेंडू थांबत थांबत येत होता. याचा फायदा गोलंदाजांनी घेत शानदार ठिकाणी गोलंदाजी केली. हा विजय आमच्या संघाचा आत्मविश्वास वाढवेल.”
हैदराबादचा मागील 8 सामन्यांपैकी हा तिसरा विजय आहे. हैदराबाद संघ गुणतालिकेत 8व्या स्थानी आहे. संघाला जर अव्वल 4 स्थानामध्ये पोहोचायचे असेल, तर आगामी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करावी लागेल. हैदराबादचा पुढील सामना 4 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. (ipl 2023 skipper aiden markram statement after winning against delhi capitals by 9 runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! आशिष नेहराने अवघड जागेवर मारली लाथ, वेदनेने तडफडताना दिसला माजी संघसहकारी, पाहा व्हिडिओ
वाढदिवस विशेष: रोहित शर्माचे ‘हे’ 5 विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडणे केवळ अशक्य