मागच्या काही सामन्यांपासून लखनऊ सुपर जायंट्स संघ चांगलाच चर्चेत आहे. शनिवारी (13 मे) लखनऊने हंगामातील आपला 12वा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळला. यजमान हैदराबादने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. पण याचदरम्यान मैदानात एक असा प्रकार घडला, ज्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा प्रकार घडला.
लाईव्ह सामन्यातदरम्यान तिसऱ्या पंचांनी दिलेला एक निर्णय वादात राहिला. 19व्या षटकात लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खान गोलंदाजीला आला होता. आवेशने टाकलेला तिसरा चेंडू वादाचे कारण टरला. यावेळी उब्दूल सामद स्ट्राईकवर होता. आवेशने टाकलेला हा चेंडू फुलटॉस आणि कंबरेच्या वरती होता. लखनऊने या चेंडूवर रिव्यू घेतला होता आणि त्याचा फायदाही संघाला मिळाला. तिसऱ्या पंचांनी हा चेंडू नो बॉल नसल्याचे स्पष्ट केले. पंचांच्या या निर्णयावर चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. याच कारणास्तव लखनऊच्या डगआउटच्या दिशने चाहत्यांना लोखंडी नट-बोल्ट फेकले. हे प्रकरण गंभीर असून यामुळे लाईव्ह सामना काही मिनिटांसाठी थांबवावा लागला.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर हैदराबादने घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकांमध्ये हैदराबादने 6 बाद 182 धावा केल्या. यात यष्टीरक्षक हैनरिक क्लासेन () याने सर्वाधिक 47 धावांचे योगदान दिले. सलामीवीर अनमोलप्रीत सिंग याने 36 धावा खर्च करून विकेट गमावली. लखनऊसाठी कर्णधार कृणाल पंड्या याने 12व्या षटकात लागोपाठ चेंडूंवर दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. 12व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कृणालने ऍडेन मार्करम, तर पुढच्याच चेंडूवर ग्लेन फिलिप्लला बाद केले. त्याव्यतिरिक्त आवेश खान, यष ठाकूर, अमित मिश्रा आणि युद्धीर सिंग यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.
दरम्यान, या सामन्यादरम्यान चाहत्यांकडून हा निराशाजनक प्रकार घडलाच. पण सोबतच विराट कोहलीच्या नावाच्या घोषणाही चाहत्यांनी दिल्या. 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली याने गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्याशी वाद घातला होता. या प्रकरणानंतर विराट विरुद्ध गंभीर आणि विराट विरुद्ध नवीन असे वाद सोशल मीडियावर सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांकडून लखनऊ सुपर जायंट्सला डिवचण्यासाठी हा प्रकार घाडल्याचे पाहायला मिळाले. (Hyderabad Crowd threw nuts and bolts at the LSG dugout)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात ‘झिरो’ ढरलेले पाच भारतीय दिग्गज, पण आता मैदानात ठरत आहेत ‘हिरो’
पुढच्या सामन्यात दिसणार गुजरात टायटन्सचा नवीन लूक! अशी आहे हार्दिकच्या संघाची नवीन जर्सी