---Advertisement---

IPL Auction । वर्ल्डकपमध्ये नडलेला ‘हा’ खेळाडू आता रोहितसोबतच खेळणार; वेगवान गोलंदाजासाठी मुंबईचा मोठा खर्च

On: मंगळवार, डिसेंबर 19, 2023 6:22 PM
Dilshan Madushanka
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मुंबई इंडियन्स तयार दिसत आहे. हार्दिक पंड्या याच्या रुपात संघाला नवा कर्णधार मिळाला आहे. बुधवारी (19 डिसेंबर) आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. मुंबई इंडियन्सने या सामन्यात श्रीलंकाचा एक असा खेळाडू खरेदी केला, जो आगामी हंगामात संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडू शकतो.

नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकन संघ उपांत्य सामन्याआधीच बाहेर पडला. पण त्यांचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याने संघासाठी अप्रतिम प्रदर्शन केले होते. भारताविरुद्धच्या सामन्यात मदुशंकाने विकेट्सचे पंचक नावावर केले होते. तेसच नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याला 4 विकेट्स मिळाल्या होत्या. वनडे विश्वचषक 2023 मध्ये मदुशंकाने श्रीलंकेसाठी सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या होत्या. तर एकंदरीत विचार करता, तो सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध विकेट्सचे पंचक घेणारा श्रीलंकेचा पहिलाच वेगवान गोलंदाज म्हणून त्याने आपल्या नावापुढे विक्रम नोंदवला.

विश्वचषकात भारतासाठी श्रीलंकेची सर्वात मोठी बाधा ठरलेला मदुशंका आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. त्याला संघात घेण्यासाठी मंगळवारी (19 डिसेंबर) फ्रँचायझीने 4.60 कोटी रुपये खर्च केले. मदुशंकाने श्रीलंकेसाठी अतापर्यंत एक कसोटी, 15 वनडे आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याला अद्याप एकही विकेट मिळाली नाहीये. पण वनडेत 31, तर टी-20आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 विकेट्स वेगवान गोलंदाजाने घेतल्या आहेत.  (Mumbai Indians spent 4.6 crores for Dilshan Madushanka)

महत्वाच्या बातम्या – 
IPL Auction 2024: 20 वर्षीय खेळाडू झाला करोडपती, चेन्नईने केले 20 लाखांचे 8 कोटी
आयपीएल 2015 नंतर खेळणारे ठरले नशीबवान! पाहा प्रत्येक हंगामातील महागडा खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---