टी 20 हा फलंदाजांचा फॉरमॅट मानला जातो. यामध्ये नियमांपासून ते खेळपट्टीपर्यंत काहीही गोलंदाजांच्या बाजूनं नसतं. टी-20 सामन्यात षटकार आणि चौकार मारले जात नसतील तर क्वचितच कोणी सामना बघेल. आयपीएलच्या बाबतीतही हेच आहे. इथे गोलंदाज विकेट घेतात पण त्यांची भरपूर धुलाईही होते. आज आम्ही तुम्हाला आयपीएलमधील अशा 5 गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या विरोधात फलंदाजांनी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
अमित मिश्रा (182 षटकार) – लेगस्पिनर अमित मिश्रा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिक घेणारा गोलंदाज आहे. एकेकाळी विकेट घेण्याच्या बाबतीत तो भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल होता. मिश्रानं 161 सामन्यांमध्ये 173 फलंदाजांना बाद केलं आहे. मात्र गेल्या काही हंगामात त्याला फार कमी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.
रविचंद्रन अश्विन (184 षटकार) – कसोटीत जगातील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या रविचंद्रन अश्विनचं नावही या यादीत आहे. आयपीएलमध्ये 171 विकेट घेणाऱ्या अश्विननं चेन्नई सुपर किंग्जकडून करिअरची सुरुवात केली. सध्या तो राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. आयपीएलच्या इतिहासात अश्विननं आतापर्यंत सर्वाधिक 699 षटकं टाकली आहेत.
युजवेंद्र चहल (193 षटकार) – युजवेंद्र चहल हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्यानं 145 सामन्यांमध्ये 187 बळी घेतले आहेत. बंगळुरूच्या पाटा विकेटवर कारकिर्दीतील बहुतांश सामने खेळूनही चहलनं अप्रतिम गोलंदाजी केली. असं असलं तरी त्यानं बरेच षटकारही खाल्ले आहेत.
रवींद्र जडेजा (193 षटकार) – राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या रवींद्र जडेजाची कारकीर्द उत्तम राहिली आहे. बॉलसोबतच बॅटनंही त्याने अद्भुत कामगिरी केली. परंतु जडेजानं भरपूर धावाही दिल्या आहेत. रवींद्र जडेजाला 591 षटकांत 193 षटकार ठोकण्यात आले आहेत.
पीयूष चावला (201 षटकार) – लेगस्पिनर पीयूष चावला हा आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणार गोलंदाज आहे. गेल्या मोसमात त्यानं मुंबई इंडियन्ससाठी अप्रतिम गोलंदाजी केली होती. चावला कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जचाही भाग राहिला आहे. लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. चावलानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 3640 चेंडू टाकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतात संधी मिळाली नाही म्हणून ‘हा’ स्टार क्रिकेटपटू इंग्लंडला रवाना, आता तिथे खेळताना दिसणार
IPL सोडा, PSL ची बक्षीस रक्कम तर WPL पेक्षाही कमी! जाणून घ्या चॅम्पियन इस्लामाबादला किती पैसै मिळाले
“मी जानेवारीतच तंदुरुस्त झालो होतो, परंतु….”; ठीक होऊनही एकही सामना का खेळला नाही हार्दिक पांड्या?