आयपीएल 2024 च्या 46व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान होतं. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. चेन्नईनं या सामन्यात हैदराबादचा 78 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकांत 3 गडी गमावून 212 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, सनरायझर्स हैदराबाद 18.5 षटकांत 134 धावांवर ऑलआऊट झाली.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचे आघाडीचे फलंदाज सलग दुसऱ्या सामन्यामध्ये अपयशी ठरले. ट्रॅव्हिस हेड 7 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. तर अभिषेक शर्मा 9 चेंडूत 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला अनमोलप्रीत सिंग पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तुषार देशपांडेनं या तिघांची विकेट घेतली.
यानंतरही नियमित अंतरान हैदरबादच्या विकेट पडत राहिल्या. एडन मार्करम 26 चेंडूत 32 तर नितीश रेड्डी 15 चेंडूत 15 धावा करून बाद झाले. हेनरिक क्लासेननं थोडाफार संघर्ष केला. मात्र तो 21 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. अब्दुल समाद 18 चेंडूत 19 धावा करून परतला. कर्णधार पॅट कमिन्स आल्यापावली तंबूत परतला. तुषार देशपांडेनं त्याला 5 धावांवर बाद केलं. शाहबाज अहमदनं 7 धावा केल्या. तुषार देशपांडेनं 4 तर मुस्तफिजूर आणि पाथीरानानं 2-2 विकेट घेतल्या.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. चेन्नईनं निर्धारित 20 षटकांत 3 विकेट गमावून 212 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडनं कर्णधाराला साजेशी खेळी खेळली. आयपीएलच्या या हंगामातील त्याचं दुसरं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. तो 54 चेंडूत 98 धावा करून बाद झाला. गायकवाडनं आपल्या खेळीत 3 षटकार आणि 10 चौकार मारले.
चेन्नईकडून डॅरेल मिशेलनं 32 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी खेळली. तर शिवम दुबेनं 20 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. सलामीला आलेला अजिंक्य रहाणे काही कमाल करू शकला नाही. तो 12 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. महेंद्रसिंह धोनी 2 चेडूत 5 धावा करून नाबाद राहिला.
सनरायझर्स हैदराबादचा एकही गोलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, मयंक मार्कंडे, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर
चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल 14 वर्षांनंतर आरसीबीनं केला ‘हा’ भीम पराक्रम! गुजरातविरुद्ध एकापाठोपाठ एक मोडले अनेक रेकॉर्ड
6,6,6,6,6… वादळाचं दुसरं नाव म्हणजे ‘विल जॅक्स’! गुजरातविरुद्ध अवघ्या 41 चेंडूत ठोकलं शतक