---Advertisement---

पुण्यात आलिशान घर अन् अप्रतिम कार कलेक्शन, जाणून घ्या ऋतुराज गायकवाडची एकूण संपत्ती किती?

On: शुक्रवार, मार्च 22, 2024 12:29 PM
Ruturaj Gaikwad
---Advertisement---

महेंद्रसिंह धोनीनं चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंंतर फ्रँचायझीनं ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान सोपवली आहे. ऋतुराज 27 वर्षांचा असून त्यानं फार कमी कालावधीत क्रिकेट विश्वात स्वतःचं नाव कमावलंय. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, सीएसकेच्या नव्या कर्णधाराकडे करोडोंची संपत्ती आहे!

ऋतुराज गायकवाडचा जन्म 31 जानेवारी 1997 रोजी पुण्यात झाला. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या ऋतुराजनं वयाच्या 19 व्या वर्षी 2016-17 च्या रणजी स्पर्धेत महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएलमध्ये त्याची एंट्री 2019 मध्ये झाली. चेन्नई सुपर किंग्जनं त्याला लिलावादरम्यान 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केलं होतं. आता पाच वर्षांनंतर तो चेन्नईचा कर्णधार बनला आहे.

रिपोर्ट्सनुसार, ऋतुराज गायकवाडची नेट वर्थ कोटींच्या घरात आहे. त्याच्या संपत्तीचा अंदाज यावरूनही लावला जाऊ शकतो की त्याची केवळ आयपीएलची फी करोडोंमध्ये आहे. त्याची अंदाजे एकूण संपत्ती 30-36 कोटी रुपये आहे. ऋतुराज बीसीसीआयच्या ‘क’ श्रेणीतील खेळाडू आहे. मात्र तो केवळ मॅच फीमधूनच पैसे कमावत नाही, तर ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिरातींमधूनही ऋतुराजची भरपूर कमाई होते.

ऋतुराज सध्या अनेक ब्रँड्सना एंडोर्स करत आहे. यामध्ये गेम्स 24X7, GO Kratos, Mount Road Social, SS क्रिकेट किट्स आणि इतर ब्रँड्सचा समावेश आहे. मॅच फी व्यतिरिक्त, ऋतुराज गायकवाड एंडोर्समेंट आणि जाहिरातींद्वारे दरमहा सुमारे 50-60 लाख रुपये कमावतो. आयपीएल 2024 साठी ऋतुराजची फी 6 कोटी रुपये आहे. आयपीएल कॉन्ट्रॅक्ट्स, मॅच फी, एंडोर्समेंट्स सोबतच त्यानं स्टॉक एक्स्चेंज आणि प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक केली आहे, जिथून त्याची बक्कळ कमाई होते.

कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या ऋतुराज गायकवाडचं पुण्यात एक आलिशान अपार्टमेंट असून, त्याची अंदाजे किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे. हे घर सोमेश्वरवाडीत आहे. ऋतुराजला महागड्या गाड्यांचाही शौक आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक आलिशान गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, ऋतुराज गायकवाडकडे ऑडी आणि बीएमडब्ल्यू एम8 सारख्या महागड्या कार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“डोळ्यात अश्रू अन् सर्व काही थांबलं होतं…”, धोनीनं कर्णधारपद सोडलं तेव्हा चेन्नईच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण कसं होतं?

कोण आहे ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार? क्रिकेटमध्ये कमावलंय मोठं नाव

चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर काय आहे धोनीचा भविष्यातील प्लॅन? ऋतुराजकडे नेतृत्व का दिलं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---