आयपीएल 2024 च्या लिलावाबाबत रविचंद्रन अश्विन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या लिलावादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघ करुण नायर याच्यासारखा खेळाडू विकत घेऊ शकते, असे त्याने सांगितले. अश्विनने यामागे मोठे कारण सांगितले आहे. तो म्हणाला की, अंबाती रायडू याच्या जागी सीएसकेला भरोशाच्या खेळाडूची गरज आहे आणि म्हणूनच ते करुण नायर याच्यासाठी बोली लावू शकतात.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या मते, आगामी लिलावात सीएसके संघ करुण नायर (Karun Nair) याला विकत घेईल. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला, “सीएसके संघ करुण नायरमध्ये गुंतवणूक करेल असं मला वाटत आहे. ते अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याच्या बदलीच्या शोधात आहेत आणि चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार आहे याची मला कल्पना नाही. ते डाव्या हाताच्या खेळाडूचा पर्याय वापरून पाहू शकतात. परंतु जर तुम्ही सीएसकेचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर त्यांनी फक्त विश्वसनीय खेळाडूंचा समावेश केला आहे.केवळ एका सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धावा करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला त्यांनी खेळवलेले नाही. तेव्हा करुण नायरला पिवळ्या जर्सीत पाहण्यासाठी सज्ज व्हा.”
जर आपण करुण नायर याच्याबद्दल बोललो तर गेल्या मोसमात तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता. केएल राहुल याच्या दुखापतीनंतर त्याचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. करुण नायरच्या आयपीएल रेकॉर्डवर नजर टाकली तर या फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत अनेक संघांकडून खेळताना 76 सामन्यांमध्ये 1496 धावा केल्या आहेत. तो दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याकडून खेळला आहे. लखनऊ सुपर जायंट्स ही त्याची सहावी फ्रँचायझी होती. (IPL 2024 CSK to buy Karun Nair Ravichandran Ashwin reveals surprising reason)
महत्वाच्या बातम्या
Abu Dhabi T10 League: भारतीय गोलंदाजाच्या ‘No-Ball’ने माजवली खळबळ, लावले जातायेत मॅच फिक्सिंगचे आरोप!
दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी! पंड्या नसला तरीही गुजरात खेळणार IPL 2024ची फायनल, म्हणाला, ‘फसवलं…’