आयपीएल 2024 चा 13 वा सामना रविवारी राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत – आम्ही प्रथम फलंदाजी करू. विकेट चांगली आहे. आम्हाला तिचा बॅटिंग ट्रॅक म्हणून वापर करायचा आहे. आम्ही स्कोरबोर्डवर मोठ्या धावा लावण्याचा प्रयत्न करू. आम्ही येथे (विशाखापट्टनम) भरपूर सराव केला आहे. या विकेटवर आम्हाला 10 दिवस मिळाले. आमच्या संघात दोन बदल आहेत. कुलदीप जखमी आहे. त्याच्या जागी पृथ्वी शॉ आला आहे. रिकी भुईच्या जागी इशांत शर्मा आला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड : इथे आमची पहिली मॅच आहे. या खेळपट्टीची आम्हाला फारशी माहिती नाही. आम्ही गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करू. आमच्या संघात कोणताही बदल नाही. मी माझ्या राज्यासाठी आणि इंडिया ‘अ’ साठी नेतृत्व केलं आहे. तसेच मला मदत करण्यासाठी टीममध्ये काही अनुभवी लोकही आहेत.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्किया, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, जेक फ्रेजर-मॅकगर्क
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान
इम्पॅक्ट प्लेअर्स – शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, मोईन अली, मिचेल सँटनर
आयपीएलच्या 17व्या हंगामात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ विजयी रथावर स्वार आहे. संघानं सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघानं सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघ 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर, तर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर आहे.
सीएसकेनं त्यांच्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला. तर दुसरीकडे, आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पहिल्या सामन्यात दिल्लीचा पंजाब किंग्जकडून पराभव झाला, तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
गुजरातनं उडवला हैदराबादचा धुव्वा! 7 गडी राखून शानदार विजय
5 अनकॅप्ड भारतीय गोलंदाज, जे 150 च्या वेगानं गोलंदाजी करू शकतात
मयंक यादवच्या वेगवान चेंडूवर प्रीती झिंटाही फिदा! ‘डिंपल गर्ल’ची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल