---Advertisement---

5 अनकॅप्ड भारतीय गोलंदाज, जे 150 च्या वेगानं गोलंदाजी करू शकतात

---Advertisement---

मयंक यादवनं आयपीएल 2024 मध्ये आपल्या वेगानं खळबळ उडवून दिली आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या या गोलंदाजानं पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ताशी 156 किमी वेगानं चेंडू टाकला, जो या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू होता. याशिवाय सामन्यात तो सतत 150 किमी प्रति तासाच्या वेगानं गोलंदाजी करत होता. पहिल्याच सामन्यानंतर अनेक दिग्गज खेळाडू मयंकला आयपीएल 2024 मधील सर्वात मोठा उगवता तारा म्हणत आहेत. मयंक व्यतिरिक्त, आम्ही तुम्हाला आणखी पाच अशा भारतीय अनकॅप्ड गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत जे ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करू शकतात.

  1. मोहसिन खान – लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसीन खाननं पंजाबविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकात 34 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. मोहिसन हा असा गोलंदाज आहे जो सरळ रेषेत ताशी 150 किमी वेगानं गोलंदाजी करू शकतो. सध्या तो सतत 140 किमी/तास पेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करत आहे.
  2. हर्षित राणा – कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या हर्षित राणानं आतापर्यंत आपल्या लाईन, लेन्थ आणि वेगानं सर्वांना प्रभावित केलं आहे. हर्षित ताशी 140 किमीपेक्षा जास्त वेगानं अतिशय आरामात गोलंदाजी करू शकतो. तसेच तो ताशी 150 किमी वेगानंही गोलंदाजी करण्यास सक्षम आहे.
  3. कार्तिक त्यागी – कार्तिक त्यागी हा नेहमीच त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. तो या हंगामात गुजरात टायटन्सचा एक भाग आहे. कार्तिककडे वेगासह चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे. उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या कार्तिकला गुजरातनं या हंगामात अद्याप संधी दिलेली नाही.
  4. मुकेश चौधरी –आयपीएल 2024 मध्ये मुकेश चौधरी चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य आहे. 2022 च्या आयपीएलमध्ये मुकेशनं चेन्नईसाठी 13 सामने खेळले, ज्यात त्यानं 16 विकेट घेतल्या होत्या. मात्र, या हंगामात त्याला अद्याप संधी मिळालेली नाही. मुकेश त्याच्या वेगवान स्पीडसाठी ओळखला जातो. तसेच तो त्याच्या अ‍ॅक्शननंही फलंदाजांना गोंधळात टाकतो.
  5. सुशांत मिश्रा – सुशांत आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सचा एक भाग आहे. तो झारखंडसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजानं आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना खेळलेला नाही. गुजरातनं त्याला तब्बल 2.2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. सुशांत त्याच्या स्विंगसह वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तो ताशी 150 किमी वेगाला स्पर्श करण्यास सक्षम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मयंक यादवच्या वेगवान चेंडूवर प्रीती झिंटाही फिदा! ‘डिंपल गर्ल’ची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल

बापरे बाप.. हा वेग आहे की मस्करी..! 21 वर्षीय मयंक यादवने टाकला IPL 2024 च्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू – पाहा व्हिडिओ । Mayank Yadav Fastest Ball Video

सलग दोन षटकार अन् तिसऱ्या चेंडूवर चारी मुंड्या चीत! स्टॉइनिस विरुद्ध राहुल चहरचा जोरदार कमबॅक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---