---Advertisement---

सलग दोन षटकार अन् तिसऱ्या चेंडूवर चारी मुंड्या चीत! स्टॉइनिस विरुद्ध राहुल चहरचा जोरदार कमबॅक

---Advertisement---

आयपीएल 2024 मध्ये शनिवारी (30 मार्च) लखनऊ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्जशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं 8 गडी गमावून 199 धावा केल्या.

लखनऊकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्कस स्टॉइनिस सुरुवातीला धावा काढण्यासाठी झगडत होता. स्टॉइनिसनं पहिल्या 9 चेंडूत केवळ 7 धावा केल्या. मात्र फिरकीपटू राहुल चहर गोलंदाजीला येताच त्यानं हात उघडले. पण काही चेंडूंनंतर राहुलनं जोरदार कमबॅक करत स्टॉइनिसची विकेटच उखडून टाकली!

8 षटकांपर्यंत लखनऊ सुपर जायंट्सची धावसंख्या 2 बाद 65 धावा होती. लेग-स्पिनर राहुल चहर 9वं षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर क्विंटन डी कॉकनं एक धाव घेतली. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिसनं हात उघडून मोठा षटकार मारला. राहुलनं तिसरा चेंडू खूपच शॉर्ट टाकला, ज्यावर स्टॉइनिसला हात उघडण्याची पूर्ण संधी मिळाली. त्यानं सलग 2 चेंडूत 2 षटकार ठोकले. यावेळी स्टॉइनिस आत्मविश्वासानं भरलेला होता.

स्टॉइनिसला चौथा चेंडूही मैदानाबाहेर मारायचा होता. मात्र राहुल चहरनं ओव्हरच्या आधीच्या चेंडूंपेक्षा चौथा चेंडू खूपच वेगानं टाकला. स्टॉइनिसनं बॅट पुढे आणण्याआधीच चेंडूनं विकेट्स विखुरल्या होत्या. यासह स्टॉइनिसचा डाव 12 चेंडूत 19 धावांवर संपुष्टात आला.

 

चहरला गेल्या 2 सामन्यात काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्यानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त 1 विकेट घेतली, तर आरसीबीविरुद्ध त्याला एकही विकेट घेता आली नाही. लखनऊविरुद्धही त्याची गोलंदाजी फारशी प्रभावी ठरली नाही. त्यानं स्टॉइनिसची विकेट नक्कीच घेतली, पण 3 षटकात 42 धावाही दिल्या.

पंजाब किंग्जकडून गोलंदाजी करताना सॅम करननं 3 बळी घेतले. त्यानं 4 षटकात 28 धावा दिल्या. अर्शदीप सिंगनं 3 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. कागिसो रबाडानं एक विकेट घेतली. लखनऊसाठी क्रुणाल पांड्या, क्विंटन डी कॉक आणि निकोलस पूरन यांनी चमकदार कामगिरी केली. पांड्यानं 22 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. त्यानं 4 चौकार आणि 2 षटकार मारले. पूरननं 21 चेंडूत 42 धावा ठोकल्या. डी कॉकनंही अर्धशतक झळकावलं. त्यानं 38 चेंडूत 54 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

केएल राहुलचा प्लॅन फसला, अर्शदीपच्या जाळ्यात अडकून स्वस्तात बाद

पूरन-क्रुणालची तुफानी फटकेबाजी, पंजाबसमोर विजयासाठी 200 धावांचं लक्ष्य

लखनऊनं कर्णधार बदलला? केएल राहुल टीममध्ये असतानाही नाणेफेकीसाठी निकोलस पूरन का आला?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---