आयपीएल 2024 च्या 11 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात एलएसजीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेकीच्या वेळी एक वेगळच दृष्य दिसलं. नाणेफेकीसाठी लखनऊचा नियमित कर्णधार केएल राहुलच्या जागी उपकर्णधार निकोलस पूरन मैदानावर आला. मात्र, राहुल प्लेइंग 11 चा भाग आहे. तेव्हापासून एलएसजीनं आपला कर्णधार बदलला का काय?, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर.
या प्रश्नाचं उत्तर नाणेफेकसाठी मैदानात आलेल्या निकोलस पूरननं दिलं. पूरन म्हणाला, “केएल राहुल दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला त्याला बराच काळ चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये थोडा ब्रेक द्यायचा आहे. तो आज केवळ खेळाडू म्हणून खेळेल. प्रत्येकानं संधीचा लाभ घ्यावा आणि सर्वोत्तम कामगिरी करावी.”
केएल राहुलच्या अनुपस्थितीत निकोलस यष्टीरक्षण करणार आहे. राहुलनं अचानक आपली भूमिका का बदलली यावर सुरुवातीला फक्त अटकळ होती. तथापि, समालोचनादरम्यान, सुरेश रैनानं राहुलला दुखापत असल्याचं स्पष्ट केलं. यामुळेच राहुलनं केवळ सलामीवीर म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. मयंक यादवनं आज लखनऊसाठी पदार्पण केलं आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 :
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बदोनी, निकोलस पूरन (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ
इम्पॅक्ट प्लेअर्स – ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, दीपक हुडा, के गौथम
पंजाब किंग्ज – शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, रिली रौसो, तनय थागराजन, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत भाटिया
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सची प्रथम फलंदाजी, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग 11
IPL 2024 मध्ये दिसेल आता रिंकू सिंहचा जलवा! विराट कोहलीनं भेट केली आपली खास वस्तू
हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला आर अश्विन; म्हणाला, “ही पहिलीच वेळ नाही जेव्हा…”