30 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल 2024 चा 11वा सामना खेळला गेला. या सामन्यात केएल राहुल लखनऊचा कर्णधार म्हणून नाही तर ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळला. या सामन्यासाठी लखनऊचा कर्णधार असलेल्या निकोलस पुरननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
केएल राहुलनं राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 58 धावांची खेळी खेळली होती. मात्र पंजाबविरुद्ध दुसऱ्या सामन्यात तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. राहुल केवळ 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, मात्र अर्शदीप सिंगच्या चेंडूवर त्याची विकेट गेली.
केएल राहुल क्विंटन डी कॉकसह सलामीला उतरला. राहुलनं पहिल्या 4 चेंडूत केवळ 3 धावा केल्या. दरम्यान, पंजाब किंग्जसाठी अर्शदीप सिंग चौथं षटक टाकण्यासाठी आला. अर्शदीपच्या पहिल्याच चेंडूवर राहुलनं मिडऑफच्या दिशेनं सरळ बॅटनं उत्कृष्ट षटकार ठोकला. षटकातील दुसरा चेंडू हुकला, तरी राहुलनं आक्रमक पवित्रा घेत तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. मात्र चौथ्या चेंडूवर अर्शदीप सिंगच्या चतुराईमुळे राहुल जॉनी बेअरस्टोच्या हाती झेलबाद झाला. केएल राहुलनं 9 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारून 15 धावांची खेळी खेळली.
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व केएल राहुलनं नाही तर निकोलस पूरननं केलं. नाणेफेकीच्या वेळी पूरननं सांगितलं की, राहुल नुकताच दुखापतीतून परतला आहे, त्यामुळे त्याला लीगच्या सुरुवातीच्या टप्प्यात विश्रांती दिली जात आहे. या सामन्यात राहुल एक ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळत असल्याचं पूरननं स्पष्ट केलं होतं.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 :
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बदोनी, निकोलस पूरन (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ
इम्पॅक्ट प्लेअर्स – ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, दीपक हुडा, के गौथम
पंजाब किंग्ज – शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, रिली रौसो, तनय थागराजन, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत भाटिया
महत्त्वाच्या बातम्या-
पूरन-क्रुणालची तुफानी फटकेबाजी, पंजाबसमोर विजयासाठी 200 धावांचं लक्ष्य
लखनऊनं कर्णधार बदलला? केएल राहुल टीममध्ये असतानाही नाणेफेकीसाठी निकोलस पूरन का आला?
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सची प्रथम फलंदाजी, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग 11