आयपीएल 2024 चा 11 वा सामना शनिवार (30 मार्च) लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर होतोय. लखनऊ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावा केल्या. आता पंजाबसमोर विजयासाठी 200 धावांचं आव्हान आहे. आजच्या सामन्यात लखनऊचा नियमित कर्णधार केएल राहुल दुखापतीनं ग्रस्त आहे. त्यामुळे राहुलच्या जागी निकोलस पूरन लखनऊचं नेतृत्व करतोय.
लखनऊ सुपर जायंट्सनं 20 षटकांत 8 गडी गमावून 199 धावा केल्या. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात दमदार झाली. मात्र, चौथ्या षटकात केएल राहुल 9 चेंडूत 15 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. देवदत्त पडिक्कलला 6 चेंडूत केवळ 9 धावा करता आल्या. मार्कस स्टाइनिसनं 12 चेंडूत 19 धावा केल्या.
लखनऊसाठी क्रुणाल पांड्या, क्विंटन डी कॉक आणि निकोलस पूरन यांनी चमकदार कामगिरी केली. पांड्याने 22 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. त्यानं 4 चौकार आणि 2 षटकार मारले. पूरननं 21 चेंडूत 42 धावा ठोकल्या. डी कॉकनंही अर्धशतक झळकावलं. त्यानं 38 चेंडूत 54 धावा केल्या.
पंजाब किंग्जकडून गोलंदाजी करताना सॅम कुरननं 3 बळी घेतले. त्यानं 4 षटकात 28 धावा दिल्या. अर्शदीप सिंगनं 3 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. कागिसो रबाडा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 :
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बदोनी, निकोलस पूरन (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ
इम्पॅक्ट प्लेअर्स – ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, दीपक हुडा, के गौथम
पंजाब किंग्ज – शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, रिली रौसो, तनय थागराजन, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत भाटिया
महत्त्वाच्या बातम्या-
लखनऊनं कर्णधार बदलला? केएल राहुल टीममध्ये असतानाही नाणेफेकीसाठी निकोलस पूरन का आला?
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सची प्रथम फलंदाजी, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग 11