भारतीय संघाचा स्टार खेळाडू तसेच रांची कसोटी मधील भारतीय संघाचा हीरा ध्रुव जुरेल याने एक सध्या वक्तव्य केलं आहे. तसेच ध्रुव जुरेल फक्त 22 वर्षांचा आहे. तर तो आयपीएलमधील राजस्थान रॉयल्ससाठी त्याच्या स्फोटक पदार्पणाच्या खेळीने त्याला प्रथमच प्रसिद्धीच्या झोतात आणले होते. तसेच त्याने 19 वर्षांखालील क्रिकेट आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली होती.
याबरोबरच रांची कसोटीत भारतीय संघाचा हिरो ठरलेल्या ध्रुव जुरेलला जेव्हा पहिल्यांदाच आयपीएलमधून पगार मिळाला तेव्हा त्या पगारातून त्याने काय केले याचा खुलासा त्याने यावेळी केला आहे. याबाबत सांगताना ध्रुव जुरेल म्हणाला आहे की, आयपीएलमध्ये पहिल्यांदा राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपयांना खरेदी केले आणि त्याला 20 लाख रुपये मिळाले, तेव्हा त्याने सर्वप्रथम कर्जाची परतफेड करत होता.
त्यानंतर तो पुढे बोलताना म्हणाला आहे की, त्याच्या वडिलांनी त्याला कधीच आपण गरीब असल्याची जाणीव करून दिली नाही. तर वडील जेव्हा माझ्यासाठी कुणाला पैसे उसने मागायचे, तेव्हा त्यांना ते अजिबात आवडत नव्हते. तसेच त्यांचे वडील भारतीय सैन्यात हवालदार पदावर होते आणि त्यांचीही इच्छा होती की त्यांनी सैन्यात भरती व्हावे, परंतु त्यांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती, त्यानंतर त्यांनी करिअर म्हणून क्रिकेटची निवड केली होती.
अशातच जेव्हा ध्रुव जुरेलने आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी स्फोटक खेळी साकारली, तेव्हा एका मुलाखतीत त्याने क्रिकेटच्या वेडाशी संबंधित अनेक किस्से सांगितले होती. त्यापैकी एक किस्सा खूपच भावनिक होता. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना त्याने सांगितले होते की, त्याच्या आईने स्वत:ची सोनसाखळी विकून त्याला क्रिकेटची किट बॅग खरेदी करुन दिली होती.
दरम्यान, ध्रुव जुरेल हा एमएस धोनी आणि एबी डिव्हिलियर्स यांना क्रिकेट जगतात आपले आदर्श मानतो. ध्रुवला धोनीप्रमाणे शांत राहायचे आहे. जेणेकरून क्रिकेटमधील कठीण क्षणांमध्ये तो थंड डोक्याने चांगले आणि चांगले क्रिकेट खेळू शकेल. फलंदाजीत तो एबी डिव्हिलियर्सला खूप फॉलो करत असतो.
महत्वाच्या बातम्या –
- WPL 2024 : ‘मी बाद झाल्यानंतर…’, मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने पराभवाचं खापर फोडलं असं
- IPL 2024 : केएल राहुल कर्णधार, अन् पूरन उपकर्णधार, पाहा लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग 11