---Advertisement---

WPL 2024 : ‘मी बाद झाल्यानंतर…’, मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने पराभवाचं खापर फोडलं असं

RCB-Women
---Advertisement---

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अतितटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 5 धावांनी विजय मिळवला आहे. तर या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. तसेच या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने नेमकी चूक कुठे झाली ते सविस्तर सांगितलं आहे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय बंगळुरुच्या अंगाशी आला होता. फलंदाजीत आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 20 षटकात 6 गडी गमवून 135 धावा करता आल्या आणि विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सला हे आव्हान तसं सोपं होतं. पण मुंबईने शेवटच्या तीन षटकात माती खाल्ली. अन् विजयाचं अंतर बॉल टू बॉल असताना हरमनप्रीत कौर विकेट देऊन बसली आणि सामना फिरला. त्यानंतर आलेले एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही.

याबरोबरच या पराभवानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली आहे की, “आम्ही खरोखरच चांगली गोलंदाजी केली, आम्ही त्यांना 140 च्या आत रोखलं होतं. फलंदाजी देखील चांगली होती पण शेवटच्या 12 चेंडूत आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. 12 चेंडूत आम्हाला फक्त एका चौकाराची गरज होती, ती आम्ही मिळवू शकलो नाही. हा खेळ तुम्हाला नेहमीच शिकवतो आणि तुमच्यावर दबाव आणतो.”

“जेव्हा मी विकेट गमावली, तेव्हा आमचे फलंदाजांनी नांगी टाकली. हा टर्निंग पॉइंट होता. सजना खरोखरच जोरदार मारा करू शकते. डब्ल्यूपीएल युवा खेळाडूंना पुढे आणण्यासाठी मदत करते. आम्ही खरोखरच खूप संघर्ष केला, हा हंगाम आमच्यासाठी चढ-उताराचा राहिला आहे, गेल्या हंगामात आम्ही खरोखरच चांगली कामगिरी केली पण आम्ही खूप काही शिकलो आणि आशा आहे की पुढच्या हंगामात आम्ही चांगली तयारी करू आणि जोरदार पुनरागमन करू.” असं हरमनप्रीत कौर पुढे बोलताना म्हणाली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर, जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, एस सजना, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---