22 मार्चपासून आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात झाली. आता जवळपास दोन महिन्यांनंतर अंतिम सामन्याची वेळ येऊन ठेपली आहे. साखळी फेरीनंतर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते. पहिल्या क्वालिफायर सामन्यात केकेआरनं एसआरएचचा 8 गडी राखून पराभव करत फायनलमध्ये स्थान निश्चित केलं. दुसरीकडे, टेबलमध्ये टॉप-2 मध्ये राहिल्यामुळे हैदराबादला अंतिम फेरी गाठण्याची दुसरी संधी मिळाली. हैदराबादनं क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.
आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स आतापर्यंत 27 वेळा आमनेसामने आले आहेत. या 27 सामन्यांपैकी केकेआरनं तब्बल 18 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादचा संघ केवळ 9 सामनेच जिंकू शकला. जर आपण आयपीएल 2024 बद्दल बोललो तर, या हंगामाच्या लीग टप्प्यात दोन्ही संघ फक्त एकदाच आमनेसामने आले होते, ज्यामध्ये केकेआरनं 4 धावांनी विजय मिळवला होता. तर क्वालिफायर सामन्यातही कोलकातानं विजय मिळवला होता.
इंडियन प्रीमियर लीगचा हा 17वा हंगाम आहे. जर आपण मागील 16 हंगामांवर नजर टाकली तर, आतापर्यंत असं सात वेळा घडलं की, गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ आयपीएल चॅम्पियन बनला. असं करणारा पहिला संघ राजस्थान रॉयल्स होता, ज्यांनी 2008 मध्ये टेबल टॉपर असताना ट्रॉफी जिंकली होती. मुंबई इंडियन्सनं (2013, 2017, 2019) टेबल टॉपर असताना आतापर्यंत चार वेळा ट्रॉफी जिंकली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्ज (2018) आणि गुजरात टायटन्स (2022) हे गुणतालिकेत शीर्षस्थानी राहून चॅम्पियन बनले आहेत. दुसरीकडे, 6 वेळा दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघानं विजेतेपद पटकावलं आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल स्टार्क यांच्यातील वैर देशांतर्गत क्रिकेटच्या दिवसांपासून जारी आहे. क्वालिफायर 1 सामन्यात स्टार्कनंच हेडला क्लीन बोल्ड केलं होतं. 2015 मध्ये स्टार्कनं वन डे चषक आणि शेफिल्ड शिल्ड ट्रॉफीमध्ये खेळताना तीन आठवड्यात हेडला तीन वेळा क्लीन बोल्ड केले होतं. 2017 मध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळताना स्टार्कनं चौथ्यांदा हेडला बोल्ड केलं होतं. आता जेव्हा ट्रॅव्हिस हेड त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे, तेव्हाही स्टार्कनं आयपीएल 2024 मध्ये त्याला शून्याच्या स्कोरवर बाद केलं.
हैदराबादचा टी नटराजन हा अत्यंत प्रतिभावान डावखुरा गोलंदाज आहे. आयपीएल 2024 मध्ये त्याने 13 सामने खेळताना 19 विकेट घेतल्या आहेत. नटराजन गेल्या अनेक वर्षांपासून सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. नटराजननं आतापर्यंत केकेआरविरुद्ध 8 सामन्यांत 15 बळी घेतले आहेत. नटराजनचा कोलकाताविरुद्ध असा एकही सामना नाही, ज्यात त्यानं किमान एकही बळी घेतला नसेल. अशा स्थितीत अंतिम सामन्यात नटराजनची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
कोलकाता नाईट रायडर्सला पुन्हा एकदा ट्रॉफी मिळवून देणार का गाैतम गंभीरचा ‘हा’ गेम प्लॅन?
आयपीएल फायनलची जगभरात चर्चा! प्रसिद्ध रॅपरनं लावला शाहरुख खानच्या टीमवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा
आयपीएलच्या फायनलमध्ये ‘हे’ 5 खेळाडू खळबळ माजवू शकतात! ट्रॉफी जिंकण्यासाठी यांना रोखणं गरजेच