आयपीएल 2024 मध्ये आज (31 मार्च) दोन सामने खेळले जात आहेत. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्ससमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सनरायजर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स – आम्ही प्रथम फलंदाजी करू. ही चांगली विकेट आहे. या स्टेडियमवर माझ्या चांगल्या आठवणी आहेत. आम्ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या केली, मात्र हे नेहमीच घडणार नाही. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
गुजरातचा कर्णधार शुबमन गिल – आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती. विकेट चांगली दिसते. आशु पा (आशिष नेहरा) आणि व्यवस्थापनाकडून मला मिळणारा पाठिंबा खूप छान आहे. आमच्या संघाच दोन बदल आहेत – स्पेंसर जॉन्सनच्या जागी नूर अहमद आणि साई किशोरच्या जागी दर्शन नळकांडे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे
इम्पॅक्ट प्लेअर्स – साई सुदर्शन, रविश्रीनिवासन साई किशोर, शरथ बीआर, मानव सुथार, अभिनव मनोहर
सनरायजर्स हैदराबाद – मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, उपेंद्र यादव
आयपीएल 2024 मधील हा 12 वा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे, कारण हे दोन्ही संघ त्यांच्या दुसऱ्या विजयाच्या शोधात आहेत. गुजरात आणि हैदराबादनं त्यांच्या घरच्या मैदानावरील पहिला सामना जिंकला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता गुजरातचा संघ घरच्या मैदानावर सामना खेळणार आहे. याचा फायदा त्यांना मिळू शकतो. पॉइंट्स टेबलमध्ये, हैदराबाद चौथ्या आणि गुजरात आठव्या स्थानावर आहे.
शुबमन गिलचा अहमदाबादमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. गुजरातनं या मोसमात आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात चेन्नई विरुद्ध त्यांचा पराभव झाला. सनरायजर्स हैदराबादनंही आतापर्यंत दोन सामने खेळले असून त्यांनी एक विजय मिळवला आहे. गेल्या सामन्यात त्यांनी मुंबईचा पराभव केला होता. हैदराबादसाठी हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी शानदार फलंदाजी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
वानखेडेवर हार्दिक पांड्याला बूइंग करणाऱ्या चाहत्यांविरुद्ध कारवाई होणार का? एमसीएनं थेटच सांगितलं