---Advertisement---

पाकिस्तानचा वनडे आणि टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार पुन्हा बदलला, टी20 वर्ल्डकपपूर्वी मोठा निर्णय

Pakistan
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत महत्वाची अपडेट समोर येत आहे. पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाचा मर्यादीत षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटचा कर्णधार पुन्हा एकदा बदलला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून याबाबत अपडेट देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या वनडे आणि टी20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा बाबर आझम याची नियुक्ती करण्यात आली आहे.

15 नोव्हेंबर 2023 रोजी बाबर आझम याने कर्णधार पदाचा त्याग केला होता. त्याने कर्णधार पद सोडत असल्याचे तेव्हा स्वतःहून जाहीर केले होते. तेव्हा पासून आजतागायत तो संघात खेळाडू म्हणून सहभागी होता. परंतू आगामी टी20 क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बाबर आझम याच्यावर पुन्हा एकदा कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ( Pakistan Cricket Board reappoints Babar Azam as the captain of white ball formats )

आज 31 मार्च 2024 रोजी बाबर आझम याची पुन्हा एकदा पाकिस्तानच्या पुरुष टी20 आणि वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाबर आझम याच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ आता टी20 वर्ल्डकपमध्ये भाग घेईल हे निश्चित झाले आहे.

अधिक वाचा –
– केएल राहुलचा प्लॅन फसला, अर्शदीपच्या जाळ्यात अडकून स्वस्तात बाद
– पूरन-क्रुणालची तुफानी फटकेबाजी, पंजाबसमोर विजयासाठी 200 धावांचं लक्ष्य
– टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघांची घोषणा कधी होणार? टीम इंडिया अमेरिकेला कधी रवाना होणार? जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---