आयपीएल 2024 मध्ये आज दोन सामने खेळले जात आहेत. पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस – विकेट नंतर चांगली होईल. म्हणून आम्ही धावांचा पाठलाग करू. या खेळाचं स्वरूप बदललं आहे. आमचे गोलंदाज गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगले राहिले आहेत. आम्ही बॅटनं मोठी धावसंख्या उभारली आहे. मॅक्सवेल पुनरागमन करतोय.
गुजरातचा कर्णधार शुबमन गिल – आम्हीही धावांचा पाठलागच केला असता. खरोखर चांगली विकेट दिसते. बोर्डवर चांगल्या धावा ठेवणं आवश्यक आहे. आम्ही चांगली फलंदाजी केली आहे. आम्ही शेवटच्या सामन्यात फक्त एका चेंडूच्या फरकानं हरलो. आमच्याकडे चागलं करण्याची हीच योग्य वेळ आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुज रावत, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, आकाश दीप, विजयकुमार वैशाख
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर्स – संदीप वॉरियर, शरथ बीआर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर
चालू मोसमात गुजरात आणि बंगळुरू प्रथमच आमनेसामने येणार आहेत. गुजरातनं आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 4 सामने जिंकले असून ते गुणतालिकेत 8 अंकांसह सातव्या स्थानी आहेत. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून 4 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता.
दुसरीकडे, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीनं नऊपैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत ते तळाच्या दहाव्या स्थानावर आहेत. मागील सामन्यात आरसीबीनं सनरायझर्स हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला होता. सलग सहा पराभवानंतर बेंगळुरूनं या सामन्यात विजयाची चव चाखली होती. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आरसीबीला गुजरातविरुद्धचा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात आणि बंगळुरू एकूण तीन वेळा आमनेसामने आले आहेत. या पैकी गुजरातनं दोन तर बेंगळुरूनं एक सामना जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आधीच पराभव, त्यात दंडाची कारवाई, मुंबईच्या कोणत्या खेळाडूला बसलाय फटका? वाचा संपूर्ण प्रकरण
लखनऊला हरवून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल, संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची अर्धशतकं
मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? टॉप-4 मध्ये येण्यासाठी आता काय करावं लागेल? जाणून घ्या