आयपीएलच्या 17व्या हंगामाला आता फक्त मोजून काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच डियन प्रीमियर लीग 2024 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. यावेळी ही लीग 2 टप्पात खेळली जाणार आहे, त्यातील पहिला भाग 7 एप्रिलपर्यंत खेळला जाईल. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. तसेच कॅप्टन हार्दिक पंड्या दुखापत झाली आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सची तिंचा वाढली आहे.
याबरोबरच, सोशल मीडियावर व्हायरल व्हीडिओमध्ये हार्दिक पांड्या एका स्ट्रेचरवर बसलेला पहायला मिळत आहे. तसेच हार्दिकला झालेल्या दुखापतीवर फिजिओ उपचार देत असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. मात्र हार्दिक पांड्या याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहता त्याला सरावादरम्यान दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सध्या मिळालेली नाही.
अशातच हार्दिक पांड्या याला सातत्याने दुखापत होत असते. कारण हार्दिकला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत पुण्यात बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मात्र आता हार्दिकला जर खरंच दुखापत झाली असेल, तर तो मुंबईसाठी फार मोठा धक्का बसू शकतो.
श्री श्री १००८ , विश्व के सर्वश्रेष्ठ ऑल राउंडर, हार्दिक कोटि कोटि पंड्या का ये चित्र साझा होने के बाद प्रश्न उठाता है कि #MI लॉबी की #OneFamily थोड़ा घबराएगी? या खुशियां मनाएगी?
बड़ी दुविधा है 🤭🤭#HardikPandya #RohitSharma #IPL2024 #NotOneFamily 😜 pic.twitter.com/6HfE9db3ug— उमेश राणा (@kshatriya_UR) March 14, 2024
दरम्यान, आयपीएल 2020 कोरोना विषाणूच्या संसर्गादरम्यान यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या हंगामात मुंबई इंडियन्सने (MI) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. तसेच एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे की, “भारतीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी तीन वाजता निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर आयपीएलचे सामने दुबईला हलवायचे की नाही याचा निर्णय बोर्ड घेईल. अशी माहिती सध्या आयपीएल बाबत समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : मुंबईनं लिलावात 9 कोटींना खरेदी केलेला खेळाडू आरसीबीत जाणार?
- IPL 2024 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जाईल? लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआय निर्णय घेण्याची शक्यता