आयपीएल 2024 च्या 47व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान होतं. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन्स गार्डन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकातानं दिल्लीवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 9 गडी गमावून 153 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, कोलकाता नाईट रायडर्सनं हे लक्ष्य 16.3 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.
कोलकाताकडून सलामीवीर फिल सॉल्टनं तुफानी सुरुवात केली. त्यानं सुनील नारायणसोबत मिळून पॉवर प्लेमध्ये 79 धावा जोडल्या. सॉल्ट 33 चेंडूत 68 धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 7 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार लगावले. नारायणनं 10 चेंडूत 15 धावांचं योगदान दिलं. रिंकू सिंगला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलं. मात्र तो फार काही कमाल करू शकला नाही. रिंकू 11 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरनं 33 आणि व्यंकटेश अय्यरनं 26 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेलनं दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 9 गडी गमावून 153 धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक नाबाद 35 धावा केल्या. तर कर्णधार ऋषभ पंतनं 20 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकारासह 27 धावा केल्या. याशिवाय अभिषेक पोरेलनं 18 आणि अक्षर पटेलनं 15 धावा केल्या. केकेआरच्या वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी घेतले. वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रिकी भुई, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर्स – अंगकृष्ण रघुवंशी, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतचा भीषण अपघात आठवून भावूक झाला शाहरुख खान; म्हणाला, “तो मला मुलासारखा…”
लखनऊच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘राजधानी एक्स्प्रेस’ फिट
रोहित शर्माचा 37वा वाढदिवस, जाणून घ्या टीम इंडियाच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती? वर्षाला किती रुपये कमावतो ‘हिटमॅन’?