आयपीएल 2024 च्या 42व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्ससमोर पंजाब किंग्जचं आव्हान आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला जातोय. पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
पंजाबचा कर्णधार सॅम करन – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आम्ही घरच्या मैदानावर 4 सामने खेळले, दुर्दैवाने सर्व चारही गमावले. आम्हाला माहित आहे की येथून काय करायचंय. लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी जॉनी बेअरस्टो परत आला आहे.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर – या सीझनबाबत मी आनंदी आहे. शेवटच्या गेममध्ये स्टार्कच्या बोटाला जखम झाली. त्याच्या जागी दुष्मंथा चमीरा आलाय. आम्हाला चांगली सुरुवात हवी, आणि नंतर त्याचं मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे. आम्ही तोच फॉर्म आणि गती कायम ठेवण्याची आशा आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), रिली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंह, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, ऋषी धवन, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ चालू हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. केकेआरनं 7 पैकी 5 सामने जिंकले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्जची कमान सॅम करनच्या हाती असली तरी त्यालाही संघाच्या कामगिरीत सुधारणा करता आलेली नाही. कर्णधारपदाच्या दबावामुळे त्याची कामगिरीही खालावली आहे. पंजाब किंग्जनं आयपीएलच्या या हंगामात 8 सामने खेळले असून त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. संघ 4 गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. शिखर धवन दुखापतीमुळे हा सामनाही खेळू शकणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रुणाल पांड्याच्या घरी पुन्हा पाळणा हालला! पत्नी पंखुडीनं दिला दुसऱ्या मुलाला जन्म
उसेन बोल्टनंतर आता युवराज सिंग बनला टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर, आयसीसीची घोषणा