आयपीएलमध्ये खेळासोबतच अनेक रंजक किस्सेही ऐकायला मिळतात. आता एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग एक रहस्य उघड करताना दिसतायेत. हे रहस्य 2003 च्या वर्ल्ड कपमधील ‘स्प्रिंग बॅट’च्या वापराबद्दलच आहे.
रिकी पॉन्टिंगवर 2003 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध ‘स्प्रिंग बॅट’ वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या अंतिम सामन्यात पाँटिंगनं 140 धावांची नाबाद खेळी खेळली होती, ज्यामध्ये 8 षटकारांचा समावेश होता. त्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध 359 धावांचा डोंगर रचला होता.
भारतीयांचा असा विश्वास आहे की, रिकी पॉन्टिंग बॅटमधील स्प्रिंगच्या मदतीनं इतके लांब शॉट्स अगदी सहजतेनं मारू शकला. ही अफवा गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. 2020 मध्ये, पॉन्टिंगनं त्या अंतिम सामन्यात वापरलेल्या त्याच्या बॅटचा फोटो शेअर केला होता. मात्र गंमत म्हणून लोकांनी त्याला ती बॅट दाखवायला सांगितली होती ज्यात स्प्रिंग आहे!
अलीकडेच दिल्ली कॅपिटल्सनं त्यांच्या सोशल मीडिया पेजवर ‘स्टिंग ऑपरेशन’ नावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंटेंट क्रिएटर सतीश रे यानं दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला 2003 वर्ल्ड कप फायनलमध्ये वापरलेल्या ‘स्प्रिंग बॅट’बद्दल विनोदीपणे विचारलं. यावर पाँटिंग यांनही गंमतीनं सांगितलं की, त्यानं स्प्रिंग बॅट वापरली होती. पण नंतर त्यानं हे मिथक उघड केलं आणि सांगितलं की त्यानं ‘स्प्रिंग बॅट’बद्दल कधीही ऐकलं नव्हतं.
📹 | (Khulasa!)³ Har 90s kid ke school ki sabse badi Afwaah ka (parda-phaash)³ 😱@SatishRay_ pic.twitter.com/k72ekbNCdY
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 26, 2024
2003 विश्वचषक फायनलबद्दल बोलायचं झालं तर, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 125 धावांनी पराभव करून विक्रमी चौथ्यांदा विश्वचषक जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 359 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 234 धावांच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅकग्रानं 3 तर ब्रेट ली आणि अँड्र्यू सायमंड्सनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर भारताकडून वीरेंद्र सेहवागनं सर्वाधिक 82 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रुणाल पांड्याच्या घरी पुन्हा पाळणा हालला! पत्नी पंखुडीनं दिला दुसऱ्या मुलाला जन्म
“मी 103 वर्षांचा आहे, पण म्हातारा नाही…”, भेटा महेंद्रसिंह धोनीचे ‘डाय हार्ड फॅन’ एस रामदास यांना
दे चौकार, दे षटकार!, नेट्समध्ये दिसलं जसप्रीत बुमराहचं वेगळच रुप; तुम्ही व्हिडिओ पाहिला का?