लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या दुसऱ्यांदा ‘बाबा’ बनला आहे. त्याची पत्नी पंखुडी शर्मा हिनं नुकताच एका मुलाला जन्म दिला. जोडप्यानं मुलाचं नाव ‘वायु’ असं ठेवलं आहे. क्रुणाल पांड्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकून याबाबत माहिती दिली. क्रुणाल पांड्याच्या पत्नीनं 21 एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला होता, मात्र त्यानं आज (शुक्रवारी) ही माहिती सार्वजनिक केली.
क्रुणाल पांड्या आणि पंखुडी शर्मा यांनी 2017 मध्ये विवाह केला होता. पंखुडी हिनं जुलै 2022 मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ‘कवीर’ असं आहे. त्यानंतर आता या दोघांच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. क्रुणाल पांड्या सध्या लखनऊ सुपर जायंट्ससोबत आयपीएलमध्ये व्यस्त आहे. मात्र त्यानं आपल्या पत्नीला भेटण्यासाठी वेळ काढला होता. त्यानं सोशल मीडियावर पत्नीसोबतची लेटेस्ट पोस्टही शेअर केली आहे.
क्रुणालच्या इंस्टाग्राम पोस्टवर चाहते मोठ्या संख्येनं कमेंट करून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. त्याच्या या पोस्टला अल्पावधीतच 75 हजार हून अधिक जणांनी लाईक केलंय. क्रुणालच्या या पोस्टवर दिनेश कार्तिक आणि शिखर धवन सह अनेक क्रिकेटपटूंनी कमेंट करून त्याचं अभिनंदन केलंय.
View this post on Instagram
33 वर्षीय क्रुणाल पांड्या आयपीएलच्या या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो आहे. त्यानं या हंगमात खेळलेल्या 8 सामन्यामध्ये 5 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्यानं 5 डावांमध्ये फलंदाजी करताना 58 धावाही केल्या आहेत. नाबाद 43 हा त्याचा सर्वोच्च स्कोर राहिला.
क्रुणाल पांड्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 2016 मध्ये मुंबई इंडियन्सकडून स्पर्धेत पदार्पण केलं होतं. तेथे 6 हंगाम खेळल्यानंतर तो 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्समध्ये शामील झाला. या अष्टपैलू खेळाडूनं आयपीएलच्या 121 सामन्यांमध्ये 1572 धावा ठोकल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावे आयपीएलमध्ये 75 विकेट देखील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“मी 103 वर्षांचा आहे, पण म्हातारा नाही…”, भेटा महेंद्रसिंह धोनीचे ‘डाय हार्ड फॅन’ एस रामदास यांना
दे चौकार, दे षटकार!, नेट्समध्ये दिसलं जसप्रीत बुमराहचं वेगळच रुप; तुम्ही व्हिडिओ पाहिला का?
200 रनचं टार्गेट पाहताच काय करावं ते सुचत नाही! धावांचा पाठलाग करताना हैदराबादची आकडेवारी खूपच खराब