---Advertisement---

दे चौकार, दे षटकार!, नेट्समध्ये दिसलं जसप्रीत बुमराहचं वेगळच रुप; तुम्ही व्हिडिओ पाहिला का?

---Advertisement---

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला त्यांचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. 27 एप्रिल रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये बुमराह नेहमीप्रमाणे धारदार यॉर्कर नाही तर चक्क एकामागून एक षटकार मारताना दिसतोय! मुंबई इंडियन्सच्या संघानं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

आयपीएल 2024 मध्ये जसप्रीत बुमराह शानदार फार्मात आहे. त्यानं खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये एकूण 32 षटके टाकली असून या दरम्यान त्यानं फक्त 6.37 च्या इकॉनॉमी रेटनं धावा खर्च केल्या आहे. आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक विकेट (13) घेणारा गोलंदाज आहे.

आता बुमराहला दाखवायचं आहे की तो केवळ चेंडूनेच नव्हे तर बॅटनही चमत्कार करू शकतो. यासाठी तो जोरदार तयारीला लागला आहे. बुमराहचा नेट्समध्ये फलंदाजी करतानाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही आनंद होत आहे. याला कारण म्हणजे, आयपीएल संपल्यानंतर लगेचच 2 जूनपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

 

जसप्रीत बुमराहच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अर्धशतक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे! त्यानं 2022 मध्ये बर्मिंगहॅम कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 4 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. बुमराहनं त्या षटकात एकूण 29 धावा केल्या होत्या, ज्या कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात कोणत्याही फलंदाजानं केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. जसप्रीत बुमराहनं या बाबतीत वेस्ट इंडिजच्या महान फलंदाज ब्रायन लाराचा विश्वविक्रम मोडला होता.

जसप्रीत बुमराह जर गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही योगदान देऊ शकला तर तो टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी मोठा बोनस ठरू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

200 रनचं टार्गेट पाहताच काय करावं ते सुचत नाही! धावांचा पाठलाग करताना हैदराबादची आकडेवारी खूपच खराब

हा कसला संघ? संजय मांजरेकरांच्या वर्ल्डकप टीममध्ये विराट कोहलीला स्थान नाही! क्रुणाल पांड्याचा समावेश तर रिंकू-दुबेला वगळलं

“आम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही…”, आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर नाराज पॅट कमिन्सची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---