आयपीएल 2024 मध्ये आजच्या दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स समोर गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. लखनऊनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
लखनऊचा कर्णधार केएल राहुल – आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. विकेट चांगली दिसते. आम्ही गेल्या दोन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी केली आणि धावांचा चांगला बचाव केला. त्यांचा आमच्याविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. त्यांचा संघही चांगला आहे. आमच्या संघात कोणताही बदल नाही. आमच्याकडे काही चांगले वेगवान गोलंदाज आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आमच्याकडे मोर्केल आणि इतर जण आहेत.
गुजरातचा कर्णधार शुबमन गिल – आम्ही प्रथम गोलंदाजीच केली असती. गेल्या सामन्याच्या 33 षटकांमध्ये आम्ही खेळात अव्वल होतो, शेवटची 7 षटकं आमच्या बाजूनं गेली नाहीत. आमच्या संघात काही बदल आहेत. साहा बाहेर पडला आहे. स्पेन्सर त्याच्या जागी येतोय. मागील सामन्यात काय घडलं ते आम्हाला विसरलं पाहिजे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव
इम्पॅक्ट प्लेअर्स – मणिमरण सिद्धार्थ, दीपक हुडा, अमित मिश्रा, युद्धवीर सिंग चरक, अर्शद खान
गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कर्मधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर्स – केन विल्यमसन, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड, मानव सुथार, जयंत यादव
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स तीन सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघानं चार पैकी दोन सामने जिंकले आहेत. दोन सामन्यांत त्यांना पराभव पत्कारावा लागला. संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये 49 धावांवर सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे नकोसा रेकॉर्ड
दे चौका, दे छक्का! आयपीएलमध्ये पुन्हा दिसली कॅरेबियन पॉवर, एकाच षटकात ठोकल्या 32 धावा!
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्माचा भीम पराक्रम! असं करणारा केवळ दुसरा भारतीय