आयपीएल 2024 च्या 48व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
लखनऊचा कर्णधार केएल राहुल – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट चांगली दिसते. आम्ही शक्य तितकं संतुलित राहण्याचा प्रयत्न करू. आम्ही काही चांगले विजय मिळवले आहेत. आमच्या संघात काही बदल. क्विंटन डी कॉक बाहेर गेला आहे. अर्शिन कुलकर्णी संघात आहेत. मयंक यादव पण परत आला.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या – आम्हाला माहित आहे की सर्व सामने करो किंवा मरो आहेत. एका वेळी एकाच मॅचवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. दुखापती आम्हाला महागात पडल्या. ही एक मोठी स्पर्धा आहे, आम्ही जेव्हाही खेळलो तेव्हा आम्ही आमच्या सर्व खेळाडूंवर विश्वास ठेवला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव
इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शिन कुलकर्णी, एम सिद्धार्थ, के गौथम, युधवीर सिंग, प्रेरक मंकड
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहाल वढेरा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह
इम्पॅक्ट प्लेअर्स – नुवान तुषारा, कुमार कार्तिकेय, डेवाल्ड ब्रेविस, नमन धीर, शम्स मुलानी
चालू हंगामात लखनऊ आणि मुंबई प्रथमच आमनेसामने येणार आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. लखनऊला गेल्या सामन्यात घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. संघानं आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर आहेत.
दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनं 9 पैकी 6 सामने गमावले असून ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. मुंबईचा गेल्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सलग पराभव झाला. हार्दिक ब्रिगेड आजच्या सामन्यात पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचा प्रयत्न करेल. आणखी एक पराभव मुंबईच्या प्लेऑफच्या शक्यतांमध्ये मोठा अडथळा आणू शकतो. मुंबईचे फलंदाज चांगल्या फार्माता आहेत, परंतु बुमराह वगळता इतर गोलंदाज विशेष छाप पाडू शकलेले नाहीत.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर लखनऊ आणि मुंबई चार वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यापैकी लखनऊनं तीन तर मुंबईनं एक सामना जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे टीम इंडियाची निवड? स्पर्धेत ठसा उमटवणाऱ्या ‘या’ 5 खेळाडूंची लागली लॉटरी
केएल राहुलचं टी20 विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडलाही संधी नाही
कमबॅक असावा तर असा! 17 महिन्यांनंतर मैदानावर परतताच रिषभ पंतला थेट वर्ल्ड कपमध्ये संधी!