दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहित शर्माच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. मोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनलाय. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी मोहित शर्माच्या 4 षटकात 73 धावा ठोकल्या. यापूर्वी हा विक्रम बसिल थंपीच्या नावावर होता. थंपीनं आयपीएल 2018 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळरूविरुद्ध 4 षटकांत 70 धावा दिल्या होत्या. आता मोहितनं त्याला मागे टाकलं आहे.
या यादीत मोहित शर्मा आणि बासिल थंपी यांच्यानंतर यश दयालचा क्रमांक लागतो. दयालनं आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 69 धावा दिल्या होत्या. त्या सामन्याच्या शेवटच्या षटकात रिंकू सिंहनं त्याला सलग 5 षटकार लगावले होते. यानंतर चौथ्या स्थानावर रीस टोपले आहे. आयपीएल 2024 मध्ये रीस टॉपलीनं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 4 षटकांत 68 धावा दिल्या होत्या.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी गोलंदाजी
मोहित शर्मा – 0/73 विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 2024
बसिल थंपी – 0/70 विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 2018
यश दयाल – 0/69 विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2024
रीस टॉपली – 1/68 विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2024
गुजरात विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी शेवटच्या 4 षटकांमध्ये तुफानी फलंदाजी केली. दिल्लीनं शेवटच्या 24 चेंडूत 97 धावा केल्या. ऋषभ पंतनं मोहित शर्माच्या 20 व्या षटकात 31 धावा ठोकल्या, ज्यामध्ये सलग 3 षटकारांचा समावेश आहे. दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकात 4 गडी गमावून 224 धावा केल्या.
कर्णधार ऋषभ पंतनं 43 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं नाबाद 88 धावांची खेळी केली. याशिवाय अक्षर पटेलनं 43 चेंडूत 66 धावांचं योगदान दिलं. शेवटच्या षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सनं 7 चेंडूत 26 धावा ठोकल्या. दिल्लीसाठी ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यात अवघ्या 68 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, संदीप वारियर सर्वात यशस्वी ठरला. त्यानं दिल्लीच्या 3 फलंदाजांना आपला बळी बनवलं. याशिवाय नूर अहमदला 1 विकेट मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
उसेन बोल्ट 2024 टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर, आयसीसीची मोठी घोषणा
मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्यानं आतापर्यंत केल्या ‘या’ 4 मोठ्या चुका, जाणून घ्या सविस्तर