आयपीएल 2024 च्या 67व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. नाणेफक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं 20 षटकांत 6 गडी गमावून 214 धावा केल्या आहेत. आता मुंबईसमोर विजयासाठी 215 धावांचं लक्ष्य आहे.
लखनऊची सुरुवात खराब झाली. डी कॉकच्या जागी सलामीला संधी मिळालेला देवदत्त पडिक्कल पहिल्याच षटकात बाद झाला. नुवान तुषारानं शून्याच्या स्कोरवर त्याला तंबूत पाठवलं. यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि कर्णधार केएल राहुल यांच्यात 48 धावांची भागीदारी झाली. स्टायनिस 28 धावा करून बाद झाला. पीयूष चावलानं त्याला पायचित केलं. दीपक हुडा काही कमाल करू शकला नाही. तो 11 च्या स्कोरवर चावलाचच शिकार बनला. नेहाल वढेरानं त्याचा अप्रतिम झेल घेतला.
लखनऊकडून निकोलस पूरननं तुफानी फलंदाजी केली. त्यानं अवघ्या 19 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पूरन 29 चेंडूत 75 धावा करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 8 षटकार लगावले. पूरन बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात केएल राहुल बाद झाला. त्यानं 41 चेंडूत 55 धावांची खेळी खेळली. पूरन आणि राहुलमध्ये 44 चेंडूत 109 धावांची भागीदारी झाली. अखेरच्या षटकांमध्ये आयुष बदोनी (22) आणि क्रुणाल पांड्यानं (12) फटकेबाजी करून लखनऊची धावसंख्या 200 पार नेली. मुंबईकडून नुवान तुषारा आणि पीयूष चावलानं 3-3 बळी घेतले.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टिरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहाल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोहित शर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवि बिश्नोई, मोहसिन खान
इम्पॅक्ट प्लेअर्स – नवीन-उल-हक, अॅश्टन टर्नर, मणिमारन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौथम
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक संघात निवड झालेल्या भारतीय खेळाडूला गौतम गंभीरचा सल्ला; म्हणाला, “तुझ्याकडे खूप अनुभव, पण…”