आयपीएल 2024 च्या 27व्या सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने आहेत. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गोलंदाजीसाठी ही विकेट चांगली दिसते. आम्ही ध्येयाचा विचार न करणे, प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणं, संघ तयार करणं याकडे लक्ष देतोय. जोस बटलर 100 टक्के फिट नाही. अश्विनला निगल आहे. त्यांच्या जागी रोव्हमन आणि कोटियन प्लेइंग इलेव्हनमध्ये आले आहेत.
पंजाबचा कर्णधार सॅम करन – शिखर धवनला निगल झाला आहे. त्यामुळे मी इथे आलोय. आम्हीही आधी गोलंदाजी केली असती, मात्र आता आम्हाला बोर्डावर धावा लावाव्या लागतील. टीम संतुलीत आहे. आम्हाला आणखी काही गेम जिंकायला आवडले असते. मधली फळी चांगली दिसते, विशेषतः शशांक आणि आशुतोष. शिखर धवनच्या जागी तायडे संघात येतोय.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 –
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा
राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या या हंगामात तुफान फार्मात आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघानं पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. शेवटच्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. संघ गुणतालिकेत 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
दुसरीकडे, पंजाब किंग्जनं दिल्ली आणि गुजरातविरुद्ध विजय मिळवला. परंतु त्यांना बंगळुरू, लखनऊ आणि हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलाय. संघ गुणतालिकेत 4 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ना विराट, ना रोहित….ट्रेंट बोल्ट म्हणाला, ‘हा’ भारतीय फलंदाज माझा आवडता