आयपीएल 2024 चा क्वालिफायर 2 सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान राॅयल्स (RR) या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. आज (24 मे) रोजी एम.ए. चिदंबरम या स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. हैदराबाद विरुद्ध राजस्थान या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये प्रवेश करेल. दोन वेळा आयपीएल ट्राॅफी विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) या हंगामात फायनल सामन्यासाठी तिकीट पक्कं केलं आहे. आजचा क्वालिफायर 2 सामनादेखील अटीतटीचा पहायला मिळणार आहे.
साखळीफेरी सामन्यात हैदराबादनं फलंदाजीच्या जोरावर धुव्वा उडवला होता. परंतु क्वालिफायर 1 सामन्यात कोलकातानं हैदराबादचा 8 विकेट्सनं एकतर्फी पराभव केला. आज हेदराबादच्या सलामी जोडीवरती नजर असणार आहे. शेवटच्या सामन्यात हेदराबादच्या सलामीवीरांनी संघासाठी चांगली सुरुवात केली नव्हती.
चेन्नईच्या मैदानावरती फलंदाजी करणं कठीण आहे. कारण चेंडू पडल्यावरती थांबून बॅटवरती येतो. त्यामुळे फलंदाजांवरती दबाव असू शकतो. हैदराबादसमोर राजस्थानचं आव्हान खूप कठीण आहे. राजस्थानकडे दोन दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल असणार आहेत.
राजस्थानं संघानं एलिमिनेटर सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) 4 विकेट्सने दारुण पराभव केला. आणि क्वालिफायर 2 साठी त्यांचं स्थान निश्चित केलं. बंगळुरुनं विजयाचा षयकार लगावला होता. मात्र एलिमिनेटर सामन्यात उत्कृष्ट कामगिरी दाखवू शकले नाहीत. राजस्थानच्या गोलंदाजांनी आरसीबीसमोर दम दाखवत संघाला विजय मिळवून दिला. मात्र संघाचा कर्णधार संजू सॅमसनचा फाॅर्म संघाला चिंतेचा विषय बनला आहे.
आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यामध्ये एकूण 19 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे. हैदराबादनं राजस्थानविरुद्ध 10 सामने जिंकले आहेत. तर राजस्थाननं 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
परंतु फक्त एका विजयानं हैदराबाद आघाडीवर आहे. आयपीएल 2024 च्या हंगामातील या दोन्ही संघांमध्ये आज दुसरी लढत असणार आहे. या हंगामात जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने होते, त्यावेळी हैदराबादनं 1 धावेनं बाजी मारत सामना जिंकला होता. त्यामुळे आजचा सामना खूप रोमांचक असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकिट 16 लाख रुपये, तर सर्वात स्वस्त सुमारे 25 हजार रुपये…
IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबी ‘या’ खेळाडूंना ठेवू शकते संघात कायम…
प्ले-ऑफमधील पराभवानंतर RCBच्या मुख्य प्रशिक्षकांची प्रतिक्रिया म्हणाले, “या सामन्यात जे काही…”