आयपीएल 2024 च्या 70व्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान आहे. गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सध्या येथे जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाणेफेकीला विलंब होत आहे.
आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे, कारण हा सामना जिंकण्यात संघ यशस्वी झाला तर ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचतील. मात्र, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघानं सामना गमावला किंवा रद्द झाला तर राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिल. अशा स्थितीत त्यांना सलग 6 सामने जिंकून इथपर्यंत पोहोचलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागेल.
आजच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह पॅट कमिन्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला. हा सामना रद्द होणं हैदराबादच्या दृष्टीनं चांगलं आहे, कारण त्यांना दुसऱ्या क्रमांकावर राहून अंतिम सामन्यात पोहचण्याच्या दोन संधी मिळतील.
राजस्थान रॉयल्स संघ सलग 4 सामने हरला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघ 19 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरनं अखेरचा सामना जिंकला तर त्यांचे 21 गुण होतील. जरी ते हा सामना हरले तरी ते लीग टप्प्यात सर्वाधिक गुणांसह पहिल्या स्थानावर राहतील.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयची 30 खेळाडूंवर करडी नजर, अय्यर-किशनबाबतही मोठा खुलासा; टीम इंडियात पुन्हा एंट्री मिळेल का?
आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरल्यानंतर विजय माल्ल्यांची प्रतिक्रिया व्हायरल, खास ट्विट करून म्हणाले…