---Advertisement---

आरसीबीविरुद्ध टॉस जिंकून राजस्थानची गोलंदाजी, विराटच्या संघात एक मोठा बदल; जाणून घ्या प्लेइंग 11

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 19व्या सामन्यात आज (6 एप्रिल) राजस्थान रॉयल्स समोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन – आम्ही या विकेटवर प्रथम गोलंदाजी करू. ही एक नवीन विकेट आहे. वेगवान गोलंदाजांना काही मदतीची अपेक्षा आहे. काही दव देखील अपेक्षित आहे. हा मोठा सीझन आहे. खेळाडू जबाबदारी घेत आहेत. आमच्या टीममध्ये कोणताही बदल नाही.

बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस – आम्हीही प्रथम गोलंदाजीच केली असती. ही विकेट चांगली दिसते. दोन्ही डावात ती तशीच राहील असं वाटतं. आमच्या फलंदाजीत एक बदल आहे. आम्ही खेळाडूंसाठी भूमिका शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही ते अद्याप करू शकलेलो नाही.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेअर्स – रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टॉपली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग

या हंगामात राजस्थान रॉयल्सची टीम विजय रथावर स्वार आहे. आयपीएल 2024 मध्ये, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील टीमनं पहिले तीनही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खराब झाली आहे. आरसीबीनं पहिल्या चारपैकी तीन सामने गमावले आहेत. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांच्या हेड टू हेड बद्दल बोलायचं झालं तर, आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ 28 वेळा आमनेसामने आले, ज्यापैकी राजस्थाननं 15 तर बंगळुरूनं 13 सामने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“मी एवढा आवाज कधीच ऐकला नव्हता”, धोनीच्या मैदानातील एंट्रीवर पॅट कमिन्सची प्रतिक्रिया

‘थाला’ला पाहण्यासाठी काहीही! हैदराबादमध्ये चाहत्यांनी तोडले स्टेडियमचे बॅरिकेड्स, पोलिसांकडून कारवाई

IPL 2024 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज कोणते? टॉप-५ मध्ये दोन अनकॅप्ड भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---