आयपीएल २०२४ च्या ५२व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सची टीम १९.३ षटकांत १४७ धावा करून ऑलआऊट झाली.
गुजरातची सुरुवात खूपच खराब झाली होती. सलामीवीर वृद्धीमान साहा दुसऱ्याच ओव्हरमध्ये बाद झाला. त्यानं १ धाव केली. चौथ्या षटकात कर्णधार शुबमन गिल बाद झाला. त्यानं २ धावा केल्या. मोहम्मद सिराजनं दोन्ही विकेट घेतल्या.
पॉवरप्लेमध्ये गुजरातची अवस्था ३ बाद २३ अशी दयनीय झाली होती. यानंतर शाहरुख खान आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरला. या दोघांमध्ये ६१ धावांची भागीदारी झाली. शाहरुख खान २७ धावा करून धावबाद झाला. विराट कोहलीनं त्याला तंबूत पाठवलं.
डेव्हिड मिलर ३० धावा करून आऊट झाला. राशिद खाननं १८ धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला विजय शंकर १० धावा करून बाद झाला. आरसीबीकडून मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.
या सामन्यासाठी आरसीबीनं आपल्या प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे, गुजरात टायटन्समध्ये दोन मोठे बदल झाले. मानव सुथारला पदार्पणाची संधी मिळाली. किरकोळ दुखापत झालेल्या साई किशोरच्या जागी सुथारचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला. तर अजमतुल्ला ओमरझाईच्या जागी आयरिश वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल या सामन्यात खेळत आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग ११
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार वैशाख
इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुज रावत, महिपाल लोमरोर, आकाश दीप, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल
इम्पॅक्ट प्लेअर्स – संदीप वारियर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव
महत्त्वाच्या बातम्या –
कोण आहे मानव सुथार? आरसीबीविरुद्ध गुजरात टायटन्ससाठी केलं आयपीएल पदार्पण
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन मैदानावर कधी परतणार? या हंगामात पुन्हा खेळणार की नाही?