बंगळुरूविरुद्ध नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकात 287 धावांचा डोंगर रचला. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. डावाच्या 8व्या षटकातच सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी स्कोरबोर्डवर 100 धावा लावल्या होत्या.
हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं अवघ्या 39 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. तो 41 चेंडूत 102 धावा करून बाद झाला. हेडनं आपल्या खेळीत 9 चौकार आणि 8 षटकार लगावले. हेनरिक क्लासेननं 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तो 31 चेंडूंत 2 चौकार आणि 7 षटकारांसह 67 धावा करून बाद झाला. सनरायझर्स हैदराबादनं पहिल्या 10 षटकांतच 128 धावा केल्या होत्या. पुढच्या 10 षटकांतही त्यांची धावगती कमी झाली नाही. 11व्या षटकानंतर असं एकही षटक नव्हत, ज्यात 10 पेक्षा कमी धावा झाल्या असतील.
हैदराबादच्या डावाच्या सुरुवातीला अभिषेक शर्मानं 22 चेंडूत 34 धावांचं योगदान दिलं. शेवटी एडन मार्करम आणि अब्दुल समद यांनी तुफानी फलंदाजी केली. मार्करमनं 17 चेंडूत 32 धावा केल्या, तर अब्दुल समदनं 10 चेंडूत 37 धावांची झंझावाती खेळी केली. हैदराबादनं शेवटच्या 5 षटकात 82 धावा करत बंगळुरूच्या गोलंदाजांची वाट लावून टाकली.
आयपीएलच्या याच हंगामात सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्स विरुद्ध 277 धावा केल्या होत्या. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर होता.आता आरसीबी विरुद्धच्या सामन्यात त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत 287 धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई झाली. लॉकी फर्ग्युसननं या हंगामातील त्याच्या पहिल्या सामन्यात 2 विकेट घेतल्या, परंतु त्यानं 4 षटकात 52 धावा दिल्या. रीस टॉपलीनंही एक विकेट घेतली, पण त्यानं 4 षटकांत 68 धावा दिल्या. तर विजय कुमार वैशाख आणि यश दयाल यांनीही आपापल्या 4 षटकात 50 हून अधिक धावा दिल्या. आरसीबीचा असा एकही गोलंदाज नाही ज्यानं 10 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटनं धावा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ट्रॅव्हिस हेडच्या अंगात आलं! अवघ्या 39 चेंडूत ठोकलं शतक, सगळे विक्रम मोडले
हार्दिक नाही तर रोहित शर्मामुळे मुंबई हरली? शतकासाठी ‘हिटमॅन’ संथ खेळला? कसं ते समजून घ्या
आकाशाकडे डोळे अन् छातीवर हात…विकेट घेतल्यानंतर पाथिराना असं सेलिब्रेशन का करतो?