आयपीएल 2024 मध्ये आज 15व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. आरसीबीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसिस – आम्ही धावांचा पाठलाग करणार आहोत. आम्ही येथे खेळलेल्या मागील सामन्यात पहिल्या डावातील विकेट संथ होती. काही ठिकाणी ती ठिसूळ आणि कोरडी आहे. तर काही ठिकाणी ओलावाही आहे. टीममध्ये अल्झारीच्या जागी टोपली आला आहे.
लखनऊचा कर्णधार केएल राहुल – ही थोडी वेगळी भावना आहे. या मैदानावर घरच्या ड्रेसिंग रूममध्ये जाण्याची सवय होती, जेव्हा मी व्हिजिटिंग ड्रेसिंग रूममध्ये गेला तेव्हा थोडं वेगळं वाटलं. आम्ही दोन्ही सामन्यांमध्ये लढा दिला. आता आम्हाला स्कोरबोर्डवर धावा करून विरोधी संघावर दबाव आणण्याची गरज आहे. टीममध्ये फक्त एक बदल आहे. मोहसिन खानच्या पाठीला दुखापत आहे. त्याच्या जागी यश ठाकूर आलाय.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), रीस टॉपली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव
इम्पॅक्ट प्लेअर्स – मणिमरण सिद्धार्थ, शेमार जोसेफ, दीपक हुडा, अमित मिश्रा, कृष्णप्पा गौथम
आरसीबीचा स्पर्धेतील चौथा सामना आहे. संघाला पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय. पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी पंजाबवर विजय मिळवला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात त्यांना केकेआर विरुद्ध सात विकेट्सनं पराभव पत्कारावा लागला. आरसीबी गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
आरसीबीसाठी दिलासादायक बाब म्हणजे, टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली चांगल्या फार्मात आहे. त्यानं स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांच्या जोरावर सर्वाधिक (181) धावा ठोकल्या आहेत. आज आरसीबीला त्याच्याकडून पुन्हा एकदा शानदार खेळीची अपेक्षा असेल.
दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. केएल राहुलच्या संघानं दोन सामन्यांपैकी एक जिंकला असून, एका सामन्यात त्यांचा पराभव झालाय. शेवटच्या सामन्यात लखनऊनं पंजाब किंग्जवर 21 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. 21 वर्षीय मयंकनं वेगाने कहर करत चालू हंगामातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू (ताशी 155.8 किलोमीटर) टाकला होता.
आरसीबी आणि एलएसजीच्या हेड-टू-हेड आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ एकूण चार वेळा आमनेसामने आलेत, ज्यामध्ये आरसीबीचं पारडं जड राहिलंय. आरसीबीनं तीन सामने जिंकले तर एलएसजीनं एका सामन्यात बाजी मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 च्या वेळापत्रकात अचानक बदल, काही सामन्यांच्या तारखा बदलल्या
धावा समान, मात्र तरीही विराट कोहलीऐवजी रियान परागकडे ऑरेंज कॅप का? जाणून घ्या
शाळेतील शिक्षिकेवरच फिदा झाला होता ट्रेंट बोल्ट! कशी सुरू झाली प्रेमकहाणी? जाणून घ्या