---Advertisement---

IPL 2024 च्या वेळापत्रकात अचानक बदल, काही सामन्यांच्या तारखा बदलल्या

---Advertisement---

आयपीएल 2024 चा पहिला आठवडा रोमांचक सामन्यांनी भरलेला होता. स्पर्धा 26 मे पर्यंत चालणार असली तरी, बीसीसीआयनं चालू हंगामातील 2 सामन्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिला बदल आहे कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचा. हा सामना आधी 17 एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार होता. परंतु आता त्याची तारीख बदलून एक दिवस आधी म्हणजे 16 एप्रिल करण्यात आली आहे. दुसरा बदल दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात करण्यात आलाय. यापूर्वी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 16 एप्रिल रोजी होणार होता. परंतु आता हा सामना 17 एप्रिल रोजी होणार आहे.

बीसीसीआयनं सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सुरक्षा व्यवस्था. 17 एप्रिल रोजी रामनवमी आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल त्या दिवशी कोलकातामधील सुरक्षा व्यवस्थेबाबत आश्वस्त नाही. कोलकाता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. याशिवाय बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामुळे सीएबीनं बीसीसीआयला, केकेआर विरुद्ध आरआर सामना एकतर एक दिवस आधी म्हणजे 16 एप्रिलला किंवा एक दिवस नंतर म्हणजे 18 एप्रिलला हलवावा, असं सुचवलं होतं.

आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सनं आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघानं दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. केकेआरचे सध्या 4 गुण असून संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरचा पुढील सामना 3 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विशाखापट्टनम येथे होणार आहे.

पहिल्या दोन सामन्यांत पराभव झाल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सचा संघ फार्मात परतला आहे. त्यांनी शेवटच्या सामन्याच चेन्नई सुपर किंग्जचा 20 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आता या दोन तुल्यबळ संघांमध्ये कोणता संघ बाजी मारतो, हे पाहण्यासारखं असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

धावा समान, मात्र तरीही विराट कोहलीऐवजी रियान परागकडे ऑरेंज कॅप का? जाणून घ्या

मोठी बातमी! अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची 2024 टी20 विश्वचषकातून माघार

विश्वचषक विजयाला 13 वर्ष पूर्ण! धोनीच्या योद्ध्यांनी आजच्याच दिवशी रचला होता इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---