आयपीएल 2024 चा 14 वा सामना सोमवारी (1 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं आपल्या धारदार गोलंदाजीनं मुंबईच्या आघाडीच्या फळीचं अक्षरश: कंबरडं मोडलं. मुंबईविरुद्ध बोल्टनं 4 षटकांत 22 धावा देऊन 3 बळी घेतले, ज्यामध्ये रोहित शर्माच्या पहिल्या चेंडूवरील विकेटचाही समावेश आहे.
न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट मैदानावर जितकी आक्रमक गोलंदाजी करतो, तितकाच खाजगी आयुष्यात तो शांत स्वभावाचा आहे. एकेकाळी या किवी वेगवान गोलंदाजाचं वैयक्तिक आयुष्य न्यूझीलंडमध्ये बरंच चर्चेत राहिलं होतं. त्याची प्रेमकथा तितकीच मनोरंजक आहे. वास्तविक, बोल्ट एका शिक्षिकेच्या प्रेमात पडला होता, जी आता त्याची पत्नी आहे. तिचं नाव आहे गर्ट स्मिथ.
गर्टचं खरं नाव अलेक्झांड्रा असून ती व्यवसायानं शिक्षिका आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, या दोघांची पहिली भेट कुठल्यातरी शाळेत झाली असावी, मात्र तसं नाही. बोल्ट आणि अलेक्झांड्रा यांची पहिली भेट हॅमिल्टनमधील एका बारमध्ये झाली होती. या पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. यानंतर बोल्टनं 2016 मध्ये अलेक्झांड्राला प्रपोज केलं. बोल्ट आणि अलेक्झांड्रा यांनी ऑगस्ट 2017 मध्ये लग्न केलं. यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये या दोघांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.
गर्ट स्मिथ क्रिकेटपटू ट्रेंट बोल्टला डेट करत आहे, हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा ती न्यूझीलंडमध्ये खूप प्रसिद्ध झाली होती. यावरून शाळेतील मुल एकमेकांशी पैजही लावायचे. नंतर जेव्हा सत्य समोर आले तेव्हा शाळेतील मुलांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.
ट्रेंट बोल्टच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं आतापर्यंत 114 एकदिवसीय सामन्यांमध्ये 24.39 ची सरासरी आणि 5.0 च्या इकॉनॉमी रेटनं 211 बळी घेतले आहेत. त्याच्या नावे 57 टी20 सामन्यांमध्ये 74 बळी असून, 78 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 317 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये रचला इतिहास, आजपर्यंत कोणताही संघ हा पराक्रम करू शकला नाही
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद विक्रम
जोस बटलरनं आपलं नाव बदललं, इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत घोषणा