आयपीएल 2024 मध्ये मंगळवारी (2 एप्रिल) 15व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान होतं. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊनं आरसीबीवर 28 धावांनी विजय मिळवला आहे.
नाणेफेक हारल्यानतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीची टीम 19.4 षटकांत सर्वबाद 153 धावाच करू शकली.
बंगळुरूकडून महिपाल लोमरोरनं 13 चेंडूत सर्वाधिक 33 धावा केल्या. त्यानं 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. रजत पाटीदार 21 चेंडूत 29 धावा, विराट कोहली 16 चेंडूत 22 आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसनं 13 चेंडूत 19 धावांचं योगदान दिलं. आरसीबीचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. लखनऊ सुपर जायंट्सकडून वेगवान गोलंदाज मयंक यादवनं अत्यंत धारदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांत 14 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले.
या आधी लखनऊनं 20 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या होत्या. क्विंटन डी कॉकनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 58 चेंडूत 81 धावांची खेळी केली. या खेळीत त्यानं 8 चौकार आणि 5 षटकार मारले. निकोलस पूरननं 21 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं नाबाद 40 धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसनं 24 आणि कर्णधार केएल राहुलनं 20 धावांचं योगदान दिलं. देवदत्त पडिक्कलनं 6 धावा केल्या. आयुष बदोनीचं खातं उघडलं नाही. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलनं दोन तर मोहम्मद सिराज, रीस टॉपली आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), रीस टॉपली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव
इम्पॅक्ट प्लेअर्स – मणिमरण सिद्धार्थ, शेमार जोसेफ, दीपक हुडा, अमित मिश्रा, कृष्णप्पा गौथम
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीविरुद्ध मयंक यादवचा कहर! वाऱ्याच्या वेगानं फेकला IPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू
IPL 2024 च्या वेळापत्रकात अचानक बदल, काही सामन्यांच्या तारखा बदलल्या