आयपीएलच्या या हंगामात विराट कोहली पहिल्या सामन्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याच्या नावावर आणखी एक ऐतिहासिक विक्रम जमा झालाय.
आयपीएलच्या चालू हंगामात कोहलीकडे ‘ऑरेंज कॅप’ आहे. तसेच तो या लीगच्या इतिहासात 7,500 धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो या आकड्याला स्पर्श करण्यापासून केवळ 34 धावा दूर होता. आयपीएलमधील आपल्या 242 व्या सामन्यात त्यानं हा विक्रम केला.
2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून विराट कोहली आरसीबीमध्येच आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात त्यानं आयपीएल कारकिर्दीतील 8 वं शतक झळकावलं. तो या लीगच्या इतिहासात सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज आहे. कोहलीनं 67 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या दरम्यान त्यानं 12 चौकार आणि 4 षटकार हाणले. तो 72 चेंडूत 113 धावा करून नाबाद राहिला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीनंतर शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीत 221 सामने खेळताना 6,755 धावा केल्या आहेत. म्हणजेच, विराट कोहली हा आयपीएलमध्ये 7 हजारांहून अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू आहे. तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर आहे, ज्यान आतापर्यंत 180 सामन्यांमध्ये 6,545 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीनं आयपीएलच्या पहिल्या हंगामात 165 आणि दुसऱ्या हंगामात 246 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यानं प्रत्येक हंगामात 300 हून अधिक धावा केल्या आहेत. 2016 चा हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट राहिला होता. त्या हंगामात त्यानं 973 धावा ठोकल्या होत्या, ज्या कोणत्याही फलंदाजानं एका हंगामात ठोकलेल्या सर्वाधिक धावा आहेत. विराट कोहलीचा हा विक्रम अजूनही कायम आहे. त्या हंगामात कोहलीनं चार शतकही ठोकली होती.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 183 धावा केल्या. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं 2 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
ग्राउंड्समनच्या मुलानं केलं आरसीबीसाठी आयपीएल पदार्पण! जाणून घ्या कोण आहे सौरव चौहान
आरसीबीविरुद्ध टॉस जिंकून राजस्थानची गोलंदाजी, विराटच्या संघात एक मोठा बदल; जाणून घ्या प्लेइंग 11