आयपीएल 2024 च्या 57व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादसमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
लखनऊचा कर्णधार केएल राहुल – आम्ही प्रथम फलंदाजी करू. आम्ही एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहोत, प्रथम चांगली फलंदाजी करू आणि धावा बोर्डवर लावू. घरच्या मैदानावर खेळल्यानं फरक पडतो. पण आम्ही इतकं क्रिकेट खेळलो आहे की परिस्थिती कशी असेल हे कळतं. क्विंटन संघात येतो आहे. मोहसिन बाहेर गेला.
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स – आम्हीही फलंदाजी केली असती. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत जिंकत राहावं लागेल. आमच्या संघात काही बदल आहेत. सनवीर अग्रवालच्या जागी येतो आहे. व्यासकांत पदार्पण करतो आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन टी कॉक, केएल राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, दीपक हुड्डा, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौथम, यश ठाकूर, रवी बिश्नोई, नवीन उल हक
इम्पॅक्ट प्लेअर्स – मनिमरन सिद्धार्थ, युधविर सिंग, देवदत्त पड्डिकल, अॅश्टन टर्नर, अमित मिश्रा
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अब्दुल समद, शाहबाजज अहमद, सनवीर सिंह, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर
आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या सनरायझर्स हैदराबादनं गेल्या काही सामन्यांमध्ये सलग पराभव पाहिले आहेत. जर संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल, तर त्यानं यापुढचे सर्व सामने जिंकावे लागतील. सनरायझर्स हैदराबादनं आतापर्यंत 11 सामने खेळले, ज्यापैकी 6 जिंकले असून पाचमध्ये पराभव पत्कारला आहे. गुणतालिकेत संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, आयपीएलच्या या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सची कामगिरी संमिश्र राहिली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघानं देखील 11 सामने खेळले, ज्यापैकी 6 विजय आणि 5 पराभवांसह ते सहाव्या क्रमांकावर आहेत. लखनऊनं हैदराबादला पराभूत केल्यास ते टॉप-4 मध्ये स्थान मिळवतील आणि त्यांच्यासाठी प्लेऑफचा मार्ग थोडा सोपा होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
सरावादरम्यान विराट कोहलीची चाहत्यांसोबत मस्ती, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिलं?
अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणारा टी20 विश्वचषक भारतात विनामूल्य कसा पाहता येणार? जाणून घ्या
टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, युजवेंद्र चहलच्या नावे आणखी एक विक्रम