इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बीसीसीआयने मंगळवारी (19 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला होता. या लिविवात सर्व संघांनी आपल्या गरजेप्रमाणे खेरदी केली. अनेकांना अपेक्षेपेक्षा कमी, तर काहींना निराश करणारी रक्कम मिळाली. पण खरेदीदार मिळाले नाहीत, अशांची संख्या मोठी आहे.
आयपीएल 2024 (IPL 2024) साठी बीबीसीआयने दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये लिलाव आयोजित केला होता. ही पहिली वेळ होती, जेव्हा आयपीएलचा लिलाव भारताच्या बाहेर आयोजित केला गेला. सर्व 10 फ्रँचायझी खेळाडूंची खरेदी करण्यासाठी याठिकाणी उपस्थित होत्या. कोलकाता नाईट रायडर्स संघाने 24.75 कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावत मिचेल स्टार्क याला संघात घेतले. तर सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने पॅट कमिन्स याला खरेदी करण्यासाठी 20.50 कोटी रुपये खर्च केले.
असे असले तरी, स्टीव स्मिथ, रासी वॅन डर ड्युसेन, जोश हेजलवूड, फिल साल्ट, जेम्स निशम आणि कायल जेमिसन ही अशी नावे आहेत, ज्यांना खरेदी करण्यासाठी एकही संघ पुढे आला नाही. भारतीय खेळाडूंपैकी करुण नायर, मुरुगण अश्विन, मनन व्होरा आणि रसफराज खान या खेळाडूंना कोणीच खरेदी केले नाही. आपण या लेखात अशाच खेळाडूवर नजर टाकरणार आहोत, ज्यांना कोणत्याच फ्रँचायझीने खरेदी केले नाही. एकूण 332 खेळाडूंना लिलिवासाठी नाव नोंदवले होते. पण त्यापैकी फ्रँचायझींकडून त्यापैकी 150 नावांवर विचार केला गेला. यातही काही अशी नावे आहेत, ज्यांचे नाव लिलिवात घेतलेच गेले नाही. ज्या खेळाडूंची नावे घेतली गेली, त्यातील 72 खेळाडूंवर प्रत्यक्षात बोली लागली.
आयपीएल 2024 लिलिवात खरेदीदार न मिळालेले भारतीय क्रिकेटपटू
करुण नायर, वकार सलामखिल, रोहन कुन्नूमल, प्रियांश आर्या, मनन वोहरा, सरफ़राज़ खान, राज अंगद बावा, विव्रान्त शर्मा, अतीत शेठ, ऋतिक शौकीन, उर्विल पटेल, विष्णु सोलंकी, कुलदीप यादव, ईशान पोरेल, शिवा सिंह, मुरुगन अश्विन, पुलकित नारंग, संदीप वारियर, ऋतिक ईस्वरन, हिम्मत सिंह, शशांक सिंह, सुमीत वर्मा, हर्ष दुबे, तनुष कोटियन, कमलेश नगरकोटी, प्रदोष पॉल, रोहित रायुडू, जी अजितेश, गौरव चौधरी, विपिन सौरव, केएम आसिफ, मोहम्मद कैफ, अभिलाष शेट्टी, गुरजपनीत सिंह, पृथ्वी राज यारा, शुभम अग्रवाल, अमनदीप खरे, केएल श्रीजीत।
आयपीएल 2024 लिलिवात खरेदीदार न मिळालेले विदेशी क्रिकेटपटू
स्टीव स्मिथ, फिल साल्ट, जोश इंग्लिस, कुसल मेंडिस, जोश हेजलवूड, आदिल राशिद, अकील हुसैन, ईश सोढी, तबरेज शम्सी, फिन एलन, कॉलिन मुनरो, रासी वॅन डर ड्युसेन, कॅस अहमद, माइकल ब्रेसवेल, जेम्स नीशाम, कीमो पॉल, ओडियन स्मिथ, दुश्मंथा चमीरा, बेन ड्वारशुइस, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टाइमल मिल्स, एडम मिल्ने, लांस मॉरिस, ल्यूक वुड.
(IPL 2024 Unsold Players, See Full List)
महत्वाच्या बातम्या –
ICC Ranking । शुबमन गिलला पछाडत बाबर पुन्हा पहिल्या स्थानी! जाणून घ्या सूर्यकुमार आणि बिश्नोईची रँकिंग
BBLमध्ये घोंगावलं जॉर्डन नावाचं वादळ! विस्फोटक बॅटिंग करत फक्त ‘एवढ्या’ चेंडूत झळकावली Fast Fifty, Record