---Advertisement---

IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा वेगळे होणार? समोर आले मोठे कारण…

On: सोमवार, फेब्रुवारी 19, 2024 3:35 PM
Rohit Sharma Mumbai Indians
---Advertisement---

रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काहीच आलबेल नसल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता यावर्षीच मुंबई इंडियन्सच्या संघाला रामराम करू शकतो. याबरोबरच मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले आहे. तसेच एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा अजूनही मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. पण रोहित शर्माचा मुंबई इंडियन्ससोबतचा १३ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पुढील वर्षी संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ३७ व्या वर्षी रोहित शर्मावर कोणता संघ बाजी मारणार हे अजून समजले नाही.

याबरोबरच, इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामानंतर पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे. तर प्रत्येक संघाला फक्त चार खेळाडू कायम ठेवण्याचा अधिकार मेगा लिलावात असणार आहे. यामध्ये तीन भारतीय आणि एका विदेशी खेळाडूचा समावेश आहे. कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना कायम ठेवू शकते. गेल्या वेळी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 16 कोटींची मोठी किंमत देऊन कायम ठेवलं होतं. पण आता मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्माच्या साथीने पुढे जात आहे. त्यामुळे रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे.

अशातच मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी देखील रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत मौन सोडले आहे.  यावर तो म्हणाला आहे की, रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे तो दबावातून मुक्त झाला आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका हिला देखील मार्क बाउचरचे हे विधान आवडले नाही आणि तिनेही इन्स्टाग्रामवर कमेंट करून संताप व्यक्त केला होता.

दरम्यान, रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मार्ग वेगळे होणे आता पूर्णपणे निश्चित झाले आहे. या वर्षीही दिल्ली कॅपिटल्सला रोहित शर्मावर सट्टा लावायचा असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण मुंबईने रोहित शर्माला दिल्ली कॅपिटल्समध्ये जाऊन दिले नाही.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---