---Advertisement---

‘ईशांत शर्मा ते अश्वनी कुमार’: आयपीएलच्या पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज!

---Advertisement---

सोमवारी रात्री, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 23 वर्षीय वेगवान गोलंदाजाच्या कामगिरीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हा गोलंदाज म्हणजे मुंबई इंडियन्सचा अश्वनी कुमार. मुंबईने या सामन्यात 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान अश्वनी कुमारला मिळाला आहे. त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा मौल्यवान बळी घेतला. तथापि, आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाने पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. ही कामगिरी एकूण 10 वेळा करण्यात आली आहे.

आयपीएल पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम करणारा ईशांत शर्मा हा पहिला खेळाडू होता. 2008 मध्ये केकेआरकडून पदार्पण करताना त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या राहुल द्रविडची विकेट घेतली. त्याच हंगामात विल्किन मोटानेही ही कामगिरी केली. 2009 मध्ये तीन गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती. आयपीएल पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर कोणत्या गोलंदाजाने कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध विकेट घेतली यावर एक नजर टाकूया.

आयपीएल पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज

1- 2008 मध्ये, ईशांत शर्माने (कोलकाता) आरबीसीच्या राहुल द्रविडला बाद केले

2- 2008 मध्ये, विल्किन मोटाने (पंजाब) चेन्नईच्या सुरेश रैनाची विकेट घेतली

3 – 2009 मध्ये, शेन हारवूडने (राजस्थान) डेक्कन चार्जर्सच्या अझहर बिलाखियाला बाद केले

4 – 2009 मध्ये, अमित सिंगने (राजस्थान) पंजाबच्या सनी सोहलला बाद केले

5- 2009 मध्ये चार्ल लँगवेल्टने (कोलकाता) राजस्थानच्या रॉब क्विनीची विकेट घेतली

6- 2010 मध्ये अली मुर्तझाने (मुंबई) राजस्थानच्या नमन ओझाची विकेट घेतली.

7- 2012 मध्ये, टीडी सुधींद्रने (डेक्कन चार्जर्स) चेन्नईच्या फाफ डू प्लेसिसची विकेट घेतली.

8- 2019 मध्ये, अल्झारी जोसेफने (मुंबई) हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली.

9- 2022 मध्ये मथिशा पाथीरानाने (चेन्नई) गुजरात टायटन्सचे शुबमन गिलला बाद केले

10 – 2025 मध्ये, अश्वनी कुमारने (मुंबई) त्याच्या आयपीएल पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर कोलकात्याच्या अजिंक्य रहाणेला बाद केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---