---Advertisement---

CSKच्या ‘या’ खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, IPL 2025 दरम्यान वडिलांचे निधन

On: मंगळवार, एप्रिल 22, 2025 8:44 AM
---Advertisement---

IPL 2025: रविवारी झालेल्या आयपीएल 2025 च्या 38 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने हातावर काळ्या पट्ट्या घालून मैदानात प्रवेश केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. एखाद्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सामन्यात हे केले जाते. सामना संपल्यानंतर कळले की सीएसके संघाचा खेळाडू डेव्हॉन कॉनवेच्या वडिलांचे निधन झाले आहे.

सामन्यानंतर सादरीकरण समारंभ सुरू करण्यापूर्वी, हर्षा भोगले यांनी काॅनवे सांत्वन करण्यासाठी त्याचे नाव घेतले. न्यूझीलंडचा हा खेळाडू मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात खेळत नव्हता. काॅनवे त्याच्या घरी परतण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जनेही त्यांच्या सोशल मीडियावर ही माहिती देऊन काॅनवेच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. संघाने पोस्ट करत लिहले कॉनवेच्या वडिलांचे निधन झाले आहे. या कठीण काळात आम्ही त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासोबत आहोत.

चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या आयपीएल सीझन 18ची सुरुवात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयाने केली, परंतु त्यानंतर संघाने सलग 5 सामने गमावले. सलग 4 पराभवांनंतर, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला, त्यानंतर एमएस धोनीने पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळली. धोनीच्या नेतृत्वाखालील हंगामातील हा दुसरा पराभव आहे आणि सीएसकेचा सहावा पराभव आहे.

डेव्हॉन कॉनवेने आयपीएल 2025 मध्ये एकूण ३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण 94 धावा केल्या आहेत. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 69 धावांची खेळी खेळली, जरी सीएसके हा सामना 18 धावांनी गमावला.

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके संघाला प्लेऑफमध्ये पोहोचणे आता खूप कठीण झाले आहे, संघ बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. सीएसकेने 8 पैकी 6 सामने गमावले आहेत, संघ पॉइंट टेबलमध्ये 10व्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रन रेट (-1.392) देखील सर्वात वाईट आहे. आता सीएसकेचे 6 सामने शिल्लक आहेत, जरी त्यांनी सर्व जिंकले तरी त्यांचे एकूण 16 गुण होतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---