---Advertisement---

DC vs RCB: ‘हा’ ठरला बंगळुरुच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 46वा सामना आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बंगळुरुने दिल्लीचा विकेट्स राखून पराभव केला. पहिल्या डावात खेळताना दिल्लीने मर्यादित षटकात 162 धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना आरसीबीने 18.3 षटकात सामन्यावर कब्जा केला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या आरसीबी संघाने भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर यजमान दिल्ली कॅपिटल्सला 162/8 धावांवर रोखले. आरसीबीसाठी भुवनेश्वरने चार षटकांत 33 धावांत तीन बळी घेतले त्याने डेथ ओव्हर्समध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स आणि अशुतोष शर्माला बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने विराट कोहली आणि कृणाल पांड्याच्या शानदार अर्धशतकांच्या मदतीने 18.3 षटकांत 4 विकेट्स गमावून 163 धावांचे लक्ष्य गाठले. ज्यात विराट कोहलीने 51धावांची शानदार खेळी केली. कृणाल पांड्याने देखील 9 वर्षांनंतर अर्धशतक ठोकण्याचा चमत्कार केला. कृणालने 47 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. शेवटी टिम डेव्हिडने 5 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारून 19 धावांची विस्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---