आगामी आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. ज्यात एकूण 574 खेळाडूंनी यासाठी नोंदणी केली आहे. यंदाचे मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. ज्यासाठी एका अशा खेळाडूने नोंदणी केली आहे. ज्याने भारताला 2012 मध्ये अंडर 19 विश्वचषक जिंकून दिला होता. पण या खेळाडूच्या नोंदणीतील विशेष बाब म्हणजे त्याने परदेशी खेळाडू म्हणून नोंदणी केली आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून उन्मुक्त चंद आहे. तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात त्यामागील नेमकं कारण काय आहे.
उन्मुक्त चंदने 2012 मध्ये कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी आयसीसी अंडर19 विश्वचषक जिंकला. संघाने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत यश संपादन केले होते. या अंतिम सामन्यात उन्मुक्त चंदने 130 चेंडूत नाबाद 111 धावा करून भारताला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत तो सामनावीरही ठरला. उन्मुक्त चंद यांचा जन्म दिल्लीत झाला. आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडूनही खेळला आहे. उन्मुक्त चंद 2011, 2012 आणि 2013 मध्ये दिल्ली संघाचा भाग होता. तो 2014 मध्ये राजस्थान रॉयल्समध्ये गेला. 2015 च्या मोसमात तो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. तो शेवटचा आयपीएल 2016 मध्ये खेळला होता.
भारतीय क्रिकेटच्या उगवत्या स्टार उन्मुक्त चंदच्या बाबतीत पुढे काही चांगले झाले नाही. तो भारतीय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमवण्यात अपयशी ठरला. यानंतर, निराश झाल्यानंतर, त्याने ऑगस्ट 2021 मध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि आपल्या कारकिर्दीला पुन्हा चांगली सुरुवात करण्यासाठी अमेरिकेत स्थलांतरित झाला. तेव्हापासून तो अमेरिकेतच क्रिकेट खेळत आहे.
वास्तविक, चंदने भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो अमेरिकेसाठी खेळतो. त्यामुळे त्याची आयपीएल 2025 च्या लिलावात परदेशी खेळाडू म्हणून नोंद झाली आहे. या मेगा लिलावासाठी एकूण 208 परदेशी नागरिकांनी नोंदणी केली आहे.
हेही वाचा-
कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचा जलवा कायम, या 4 संघांविरुद्ध टी20 मालिका जिंकली
तिलक वर्माने मोडला विराट कोहलीचा महान विक्रम, 2 शतके झळकावून माजवली खळबळ
IND VS SA; संजू-तिलक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक दोन नव्हे तर चक्क इतके विक्रम मोडले