आयपीएल मेगा लिलावापूर्वीची तयारी जोरात सुरू आहे. आयपीएल संघांनी सातत्याने आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात हा मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि युझवेंद्र चहल सारखे मोठे भारतीय खेळाडू या लिलावाचा भाग असतील. याशिवाय विदेशी खेळाडूंमध्ये जॉस बटलर, फिल सॉल्ट, क्विंटन डी कॉक, मिचेल स्टार्क आणि जोफ्रा आर्चर या नावांचा समावेश आहे. पण या बातमीद्वारे आपण त्या विदेशी खेळाडूबद्दल बोलणार आहोत, जो आयपीएल मेगा लिलावात सर्वात महाग विकला जाऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेराल्ड कोएत्झीवर आयपीएल मेगा लिलावात पैशांचा वर्षाव होऊ शकतो. या खेळाडूला लिलावात चांगली रक्कम मिळू शकते. जेराल्ड कोएत्झी फलंदाजीसोबतच भारताविरुद्ध गोलंदाजीतही चमक दाखवत आहे. या मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात जेराल्ड कोएत्झीने शेवटच्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण 23 धावा केल्या. यानंतर गोलंदाज म्हणून 3 बळी घेतले. भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव जवळपास निश्चित वाटत होता. पण यानंतर जेराल्ड कोएत्झी आणि ट्रिस्टन स्टब्सने सामन्याचा रंग बदलला. या सामन्यात गेराल्ड कोएत्झीने 19 धावा केल्या. तसेच 1 विकेट देखील घेतले. अशा प्रकारे मेगा लिलावपूर्वी त्याची ही लय त्याला मोठी रक्कम मिळवून देऊ शकते.
जेराल्ड कोएत्झी आयपीएल 2024 मध्ये खेळला आहे. तो हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली तो मुंबई इंडियन्सचा एक भाग होता. मात्र, आता मुंबई इंडियन्सने जेराल्ड कोएत्झीला सोडले आहे. गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सने जेराल्ड कोएत्झीचा 5 कोटी रुपयांना समावेश केला होता. जेराल्ड कोएत्झीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 10 सामन्यात 13 विकेट घेतल्या. मात्र, यावेळी आयपीएल मेगा लिलावात जेराल्ड कोएत्झीवर कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा-
सूर्यकुमार यादवचे मोठे वक्तव्य, पाकिस्तानमध्ये न जाण्याचे कारण सांगितले, पाहा VIDEO
IND vs AUS: हा ऑस्ट्रेलियन फलंदाज जसप्रीत बुमराहला घाबरला! मालिकेआधी मोठं वक्तव्य
पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल? या 2 खेळाडूंना पदार्पणाची संधी!