आयपीएल 2025च्या 23व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 58 धावांनी पराभव केला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने पहिल्या डावात खेळताना 217 धावांचा मोठा स्कोर उभारला होता. प्रत्युत्तरादाखल, राजस्थान सुरुवातीच्या अपयशातून सावरू शकले नाही आणि त्यांना 58 धावांनी सामना गमवावा लागला. कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांनी खूप प्रयत्न केले, परंतु यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा यांच्यासह इतर फलंदाज अपयशी ठरले. हेटमायरने 32 चेंडूत 52 धावांची खेळी केली.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सना 218 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा यांनी 12 धावांत आपले विकेट गमावल्याने संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जयस्वाल 6 धावा करू शकला आणि नितीश फक्त 1 धाव करू शकला. संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी मिळून 48 धावा जोडल्या, पण पराग 14 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत, जिथे संघाला ध्रुव जुरेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तोही फ्लाॅप ठरला.
A shot which had SIX written all over it! 🤩💪🏻#SanjuSamson finds the mid of the bat to send the #ArshadKhan delivery fluing over covers boundary! 💪🏻
— Star Sports (@StarSportsIndia) April 9, 2025
Watch the LIVE action ➡ https://t.co/Bu2uqHSFdi #IPLonJioStar 👉 #GTvRR | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi &… pic.twitter.com/Myg2MXK9Sc
राजस्थान संघ मोठ्या संकटात सापडला होता. दरम्यान, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांनी 48 धावा जोडल्या, पण संघ विजयाची आशा करू लागला तेव्हाच सॅमसन 41 धावांवर बाद झाला. त्याने 4 चाैकार आणि 2 षटकार मारल्या. संजूची विकेट गुजरात टायटन्ससाठी बुस्टर डोस ठरली. यानंतर जीटीने झटपट विकेट्स मिळवल्या. आधीच 116 धावांपर्यंत राजस्थान संघाचा अर्धा भाग पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर, हेटमायर काही काळ क्रीजवर राहिला, परंतु इतर फलंदाज येत राहिले आणि लवकर बाद होत राहिले. त्यामुळे राजस्थानचा दारुण झाला.