IPL: यंदाच्या हंगामातील 31व्या सामन्यात, पंजाब किंग्ज म्हणजेच पीबीकेएस संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चमत्कार केला. पंजाबने एका रोमांचक कमी धावसंख्येच्या सामन्यात कोलकात्याचा 16 धावांनी पराभव करून नवा इतिहास रचला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर यजमान पंजाब संघाचा डाव फक्त 111 धावांवर संपुष्टात आला. पंजाबचा एकही फलंदाज सातत्यपूर्ण खेळू शकला नाही. प्रभसिमरनने सर्वाधिक 30 धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून हर्षित राणाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
पंजाबच्या 111 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता 15.1 षटकात 95 धावांवर ऑलआउट झाला. अशाप्रकारे, पंजाबने आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा मोठा पराक्रम केला. याआधी आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर होता. 2009 च्या आयपीएलमध्ये सीएसकेने 116/9 धावांचा बचाव केला होता. आता पंजाबने सीएसकेचा हा विक्रम मोडला आहे. आयपीएलमध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रमही पंजाब किंग्जच्या नावावर आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे पंजाबने आयपीएल 2024 मध्येच कोलकाताविरुद्ध हा मोठा पराक्रम केला होता.
– Won IPL Trophy for KKR.
— Tanuj (@ImTanujSingh) April 15, 2025
– Finalist for Delhi Capitals.
– 4 Wins for Punjab Kings in IPL 2025.
– Lowest Total defended in IPL History.
SHREYAS IYER – ONE OF THE GREATEST CAPTAINS IN IPL HISTORY. 🙇🫡 pic.twitter.com/YxCDu9TKEs
या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता यांनी मिळून एकूण 206 धावा केल्या, जो आयपीएलमधील एका सामन्यात सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम आहे. याआधी 2009 च्या आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात हा पराक्रम पाहायला मिळाला होता. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात दोन्ही संघांनी एकूण 237 धावा केल्या होत्या.
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, पंजाबच्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकात्याचे फलंदाज गडगडले. नारायण आणि डी कॉक लवकर डावाच्या दुसऱ्याच षटकात बाद झाले. रहाणे-रघुवंशीच्या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण चहलच्या फिरकीने सामन्याला कलाटणी दिली. चहलने 4, तर जॅन्सेनने 3 बळी घेतले. रसेलने अखेरपर्यंत झुंज दिली, पण शेवटी पंजाबने हा थरारक सामना जिंकला.